राजस्थान शेजारील राज्य पंजाब मधिल शेतकरी आंदोलनामुळे काही दिवस झाले रेल्वेचे शेड्युल खराब होत आहे याचा परिणाम महाराष्ट्राला सुद्धा होत आहे . या आंदोलनामुळे उत्तर आणि पश्चिम रेल्वेच्या पुन्हा एकदा मंगवारवार आणि बुधवारी दोन लांब पल्ल्याच्या रेल्वे बंद केल्या . आणि काही रेल्वे मार्ग बदलण्यात आले आहेत . काही दिवसापासून या आंदोलनाचा रेल्वेवर खूप परिणाम होत आहे . यामळे एक रेल्वेचा मार्ग सुद्धा बदलण्यात आला आणि हे बऱ्याच दिवसापासून सतत घडत आहे .
उत्तर पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे की जोपर्यंत शेतकरी आंदोलन चालू राहील तोपर्यंत गाड्या रद्द करण्याची आणि मार्ग बदलण्याची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार आहे. या वेळी सुद्धा शेतकरी आंदोलनामुळे पुन्हा एकदा दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे, पण रेल्वेकडे याशिवाय पर्याय नाही.
या रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत:
1. 02422 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी जम्मू-अजमेर
2. 02421 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी अजमेर-जम्मूतवी दैनिक
या ट्रेनसाठी मार्ग बदलला आहे:
1.ट्रेन क्रमांक 05910 लालगड-दिब्रुगड रेलसेवा -17 आणि 18- नोव्हेंबरला लालगडहून सुटणारी ही ट्रेन हनुमानगड-सादुलपूर-हिसार-भिवानी आणि रोहतक या रूपांतरित मार्गावरुन धावेल.
गुर्जर आरक्षण आंदोलनामुळे गाड्यांच्या वेळापत्रकातही परिणाम झाला:उल्लेखनीय आहे की यापूर्वी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या गुर्जर आरक्षण चळवळीमुळे उत्तर-पश्चिम रेल्वेने 12 दिवस दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आपल्या गाड्यांचा मार्ग बदलला होता. या आंदोलनामुळे गुर्जर आंदोलकांनी दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर भरतपूर जिल्ह्यातील पिलूपुरा येथे रेल्वे ट्रॅक ताब्यात घेतला आणि तेथे तंबू ठोकले आहे . परंतु या अडथळा असूनही या मार्गावर एकही ट्रेन रद्द केली गेली नाही, फक्त त्यांचा मार्ग बदलला.यामुळे धान्याच्या दळणवळणास खुप त्रास सहन करावा लागत आहे .
Share your comments