सध्या नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीच्या भावामध्ये चांगल्या प्रकारची तेजी आली आहे. सध्या मिरची हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे.
या बाजार समिती मध्ये कोरड्या लाल मिरची ने 16 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. जर नंदुरबार बाजार समिती मधील मिरचीच्या भावाचा विचार केला तर सध्या येथे लाल मिरचीला सात हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर कोरडी लाल मिरचीने सोळा हजारांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जवळजवळ एक लाख 65 क्विंटल मिरची खरेदी चा टप्पा पार केला असून येत्या काही दिवसात ही बाजार समिती मिरची खरेदी चा दोन लाखाचा टप्पा देखील पार करेल असा एक अंदाज आहे.
कोरड्या लाल मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून लाल मिरचीची आवक कमी असल्याने बाजार भाव टिकून राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर येथे वेगवेगळ्या भागांमधून मिरची विक्रीसाठी येत असते.
हा जिल्हा मध्य प्रदेश राज्याला लागून असल्याने मध्य प्रदेश यामधून देखील मोठ्या प्रमाणात मिरची या बाजारपेठेत दाखल होते. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मिरचीची तोडणी अजूनही सुरू असून अजून भाव वाढतील अशा प्रकारचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Share your comments