एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब गरजेचा : राज्यमंत्री तनपुरे

08 July 2020 06:06 PM


अहमदनगर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांना मुबलक व माफक दरात वीजपुरवठा कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री कृषी सौर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. लवकरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून शेतकरी व विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी शेती करायला हवी, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

जेऊर व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ना. तनपुरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, जि. प. सदस्य गोविंद मोकाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, संजय मेहेत्रे, संजय मेचकर, बहिरवाडीचे सरपंच विलास काळे, राजू दारकुंडे, संजय आवारे, दत्तात्रय आवारे, दत्ता म्हस्के, डॉ. अजय मगर, दिगंबर मगर, बाळासाहेब मगर, संजय ससे, रामदास ससे, दत्तात्रय म्हस्के, बाळासाहेब मोकाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

minister tanpure integrated farming farmer अहमदनगर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे एकात्मिक शेती कृषी विभाग agriculture department महात्मा फुले कृषी विद्यापीठ mhatma phule agriculuture university
English Summary: farmer should try for integrated farming - minister tanpure

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.