1. बातम्या

ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद

KJ Staff
KJ Staff


परभणी:
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असुन शेती क्षेत्राला त्याचा जबर फटका बसला आहे. सध्याच्या कोरोंना विषाणू परिस्थितिमध्ये भाजीपाला, फळबाग, उन्हाळी पीक व्यवस्थापन, किड व्यवस्थापन, बाजारपेठ, खरीप हंगाम पूर्व तयारी आदी विषयावर कृषि शास्‍त्रज्ञांनी परभणी जिल्‍हयातील 22 गावामधील शेतकर्‍यांशी ऑडिओ कॉन्‍फरन्‍सव्‍दारे दिनांक 22 एप्रिल रोजी संवाद साधला. 

सदरिल कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्‍यात आला होता. ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी बांधवानी विद्यापीठ तज्ञांना विचारलेल्‍या प्रश्नास विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. या संवाद कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी सहभाग घेतला तर कृषिविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, उद्यानविद्या सहयोगी प्राध्यापक डॉ. बी. एम. कलालबंडी, कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी.पटाईत आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे त्यांचे शेती व्यवस्थापन संदर्भात प्रश्न विचारले.

मार्गदर्शन करताना डॉ. आळसे यांनी कोरोंना विषाणू परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करतांना सामाजिक अंतर जोपासणे गरजेचे असुन लॉकडाउन दरम्‍यान भाजीपाला बाजारपेठेत आणायचा असल्यास शेतकऱ्यांनी पास सेवा साठी कृषि विभागाशी संपर्क साधाण्‍याचे आवाहन केले. या कॉन्फरन्समध्ये 22 गावामधील 31 शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशन परभणी जिल्‍हा व्यवस्थापक श्री. विलास सवाणे, कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters