1. बातम्या

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली ६०० कोटी रुपयांची उलाढाल

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता योजनेतून यावर्षी कडधान्य खरेदी ६०० कोटी रुपयांच्या पुढे केली आहे. आतापर्यंत ४३४ कोटी रुपयांचे चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता योजनेतून यावर्षी कडधान्य खरेदी ६०० कोटी रुपयांच्या पुढे केली आहे. आतापर्यंत ४३४ कोटी रुपयांचे चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत विक्रमी १२ लाख क्किंटल कडधान्याची खरेदी झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ३०३ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलेल्या खरेदीचे एकत्रित मूल्य ६०९ कोटी रुपये आहे. म्हणजे चुकाऱ्याची ४३४ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहे. खरेदीचे उर्वरित चुकारे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना दिले जातील. नाफेड व एफसीआय ची राज्यातील एजन्सी म्हणून महाएफपीसीने दोन वर्षांपूर्वी शेतमाल खरेदीला सुरुवात केली होती.

तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकरीता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली. त्यामुळे सर्व माल कंपन्यांना खरेदी केला. राज्यातील ९३ हजार ६२७ अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला. राज्यातील १६० शेतकरी कंपन्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी करुन दाखविली आहे. यामध्ये तुरीची दोन लाख ७६ हजार ०९०० क्किंटल तर हरभऱ्याची ९ लाख २२ हजार ६६० क्किंटल खरेदी झाली आहे. लॉकडाऊनमुळे शेतीमील खरेदीत अडथळे आले होते. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने पीएसएस खरेदीला लॉकडाऊनमध्ये सूट दिली. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना यंत्रणा योग्य पद्धतीने वापरून खरेदी पूर्ण करणे शक्य झाले.

English Summary: farmer producer company buy 600 crore rupees food grains Published on: 20 July 2020, 04:54 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters