महाराष्ट्रात सद्ध्या गांजा चांगलाच चर्चेत आहे, मागच्या महिन्यात गांजा लागवडीचे मागणी करणारे पत्र व्हायरल झाल होत तसेच गेल्या पंधरवाड्यात नगर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गांजाचे मळे लावल्याचे वृत्त समोर आले होते. आता असंच एक प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्राच्या मानाचा तुरा म्हणुन ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यात गांज्याची शेती करणे शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नाळेगावामध्ये एका शेतकऱ्यांने गांजाचा मळा फुलवला पण गांज्याची ही अवैध लागवड शेतकऱ्याला चांगलीच महागात पडली. पोलिसांनी ह्या शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तब्बल 157 किलो गांजा व 9 लाख रुपये ताब्यात घेतले. शेतकरी आपल्या दोडक्याच्या पिकात लपून छपून गांजाची शेती करत होता. गांजाचे उत्पादन आणि विक्री दोन्ही गोष्टीवर बंदी असताना देखील हा पट्ठ्या गांजाची शेती करत होता.
भारतात गांजाची शेती करण्यास बंदी आहे, हे माहित असूनही औरंगाबादमधील वैजापूरच्या शेतकऱ्याने पैसे कमवण्यासाठी त्याची लागवड केली. शेतकऱ्याने दोडक्याच्या शेतात गांजाची लागवड केली होती. आपल्या गुप्त सौर्सकडून माहिती मिळताच, पोलिसांनी धडक कारवाई केली आणि शेतकऱ्याकडून 157 किलो गांजा जप्त केला. तसेच, 303 गांजाची रोपे जप्त केली आणि 9 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देखील जप्त करण्यात आली. पैशांसाठी गांजा लागवड केल्याप्रकरणी आरोपी शेतकरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई करत आहेत.
'ह्या' अशा घटना पासुन काय मिळतो बोध
मित्रांनो भारतात अमली पदार्थांच सेवन करणे, त्यांचे उत्पादन करणे, शेती करणे कायद्याने गुन्हा आहे. ह्या अशा प्रकारचे कार्य करून शेतकरी बांधव अडचणीत सापडू शकतो त्यामुळे देशात असलेल्या कायद्याचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपल्या संविधानाने ज्याप्रमाणे आपल्याला काही मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत त्याप्रमाणे काही कर्तव्य देखील देण्यात आले आहेत त्यामुळे कर्तव्याचे निष्ठेने पालन करावे.
अलीकडेच अमली पदार्थच्या सेवन करण्याच्या कारणावरून शाहरुख खानच्या मुलाला अटक झाल्याचे वृत्त आपण सर्व्यानी पाहिलेच आहे ही घटना आपल्याला कायद्याचा वचक दाखवण्यासाठी पुरेशी आहे त्यामुळे हे असले कृत्य टाळावे आणि एक सुजाण नागरिक म्हणुन आपल्या देशाचा स्वाभिमान उंचवावा.
Share your comments