1. बातम्या

शेतकऱ्याने केले धमाल काम! या प्रगतिशील शेतकऱ्याने महावितरणची भरली तब्बल 15 लाख रुपये कृषिपंपाची वीजबिल थकबाकी

सध्या बर्याहच दिवसांपासून राज्यभरात कृषी पंप थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम चालू होती. त्यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण तयार झाले होते. कालच ऊर्जामंत्री यांनी कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम तीन महिन्यासाठी स्थगित केली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
farmer pay 15 lakh electric pending bill

farmer pay 15 lakh electric pending bill

सध्या बर्‍याच दिवसांपासून राज्यभरात कृषी पंप थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम चालू होती. त्यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण तयार झाले होते. कालच ऊर्जामंत्री यांनी कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम तीन महिन्यासाठी स्थगित केली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर  एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे.याबद्दल सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतकऱ्यांवरील जो ठपका आहे की शेतकरी वीज बिल भरत नाहीत, तो ठपका पुसण्याचे काम या शेतकऱ्याने केले आहे.

 शेतकऱ्याने भरली तब्बल पंधरा लाख थकबाकी…..

 या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव आहे हाजी निसार अली शेर मोहम्मद मक्रानी. यांनी थोडेथोडके नव्हे तब्बल पंधरा लाख रुपये इतके कृषी पंप विज बिल थकबाकी भरली व थकबाकी तुन ते मुक्त झाले. महावितरण व राज्य शासनाच्या कृषी वीजबिल धोरणाचा फायदा घेत त्यांनी मोठी  सवलत मिळवत थकबाकी तून  मुक्तता मिळवली.हाजी निसार अली हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांना सरकारचा वसंतराव नाईक कृषि निष्ठ पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनीही थकबाकी चेकच्या माध्यमातून भरली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. ते स्वतःच्या शेतीसह भाडेतत्त्वावर शेती घेऊन शेती करतात. त्यांनी तळोदा तालुका आणि दलेल पूर, प्रतापपुर अशा ठिकाणी शेती भाडेतत्त्वावर घेतली असून या एकूण शेतीसाठी त्यांनी 27 कृषी पंप जोडले आहेत. हे 27 कृषी पंप कार्यान्वित असल्यामुळे जास्त विजेचा वापर होतो त्यामुळे सहाजिकच बिलाची देखील रक्कम भलीमोठी आहे. अशातच मकरानी यांनी एवढी मोठी थकबाकी भरून महावितरणला सहकार्य केले आहे.मगाशी काही कारणांमुळे त्यांच्याकडे असलेले वीजबिल थकित झाले होते. तसेच महावितरणने काही दिवसांपासून वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. 

शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी त्यामुळे बऱ्याच सरकारच्या योजना देखील जाहीर केले आहेत.तळोदा येथे लोक आदालत असल्याने महावितरणने न्यायालय परिसरातच कृषी वीजबिल मेळावा आयोजित केला. या मेळाव्यामध्ये मकरानी यांनी वीज बिल भरण्याचे आश्वासन दिले व दुपारी महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीस-वीजबिलांची असलेली 15 लाख 23 हजार 70 रुपयांची थकबाकी जमा केली.

English Summary: farmer pay fifiteen lakh electric pending bill to mahavitaran in nandurbaar district Published on: 16 March 2022, 07:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters