1. बातम्या

ब्रेकिंग: मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यायला लावणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखीमपूर खेरी येथून टिकैत दिल्लीला येत होते. खुद्द टिकैत यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.

Rakesh Tikait

Rakesh Tikait

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखीमपूर खेरी येथून टिकैत दिल्लीला येत होते. खुद्द टिकैत यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे दिल्ली पोलिस शेतकऱ्यांचा आवाज दाबू शकत नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. लखीमपूर खेरीतील आंदोलनानंतर राकेश टिकैत आपल्या समर्थकांसह दिल्लीत पोहोचले. मात्र माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.

हे ही वाचा: शेतकऱ्यांनो 'या' कारणाने दुधाची फॅट होते कमी; फॅट वाढविण्यासाठी वापरा हे तंत्र

या बदल्यात शेतकरी नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावरच आंदोलन करण्यास सुरुवात केली, यावर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी सर्वांना अटक करून मधु विहार पोलिस एसीपी कार्यालयात नेले आहे.

हे ही वाचा: 2024 मध्ये विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अखिलेश यादव यांनी सांगितले महाराष्ट्रातील 'या' नेत्याचे नाव..

यानंतर टिकैत यांनी एक व्हिडिओ मेसेज जारी करून प्रश्न उपस्थित केला आहे की, दिल्लीत शेतकऱ्यांच्या प्रवेशावर बंदी आहे का? सोबतच त्यांनी असा सवालही केला की, कोणी हिरवे ब्लँकेट आणि चादर घालून दिल्लीला जाऊ शकत नाही का? जंतरमंतरवर बेरोजगारीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती टिकैतने या व्हिडिओमध्ये दिली आहे.

हे ही वाचा: Gujarat Election: गुजरातमध्ये होणार महामुकाबला! केजरीवाल ठोकणार गुजरातमध्ये तळ..

English Summary: Farmer leader Rakesh Tikait arrested Published on: 21 August 2022, 03:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters