काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. राजू शेट्टी यांनी अचानक ही घोषणा का केली याबाबत यामुळे चर्चा सुरु झाली होती. आता त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, किमान समान कार्यक्रमावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. असे असताना मात्र, एकत्र येऊनही हे लोक सुधारत नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडलो आहे. शरद पवार तर ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच ते म्हणाले, एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. तसेच सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. वाढलेल्या ऊस क्षेत्राची माहिती सरकारला होती.
त्यांनी त्याबाबत नियोजन करणे गरजेचे होते. योग्य नियोजनाच्या अभावामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. राज्यात ६५ ते ७० लाख टन ऊस गळीताशिवाय शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. प्रत्येक गावांमधील ग्रामसभेत शेतीला दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
शेतमालाला हमीभाव केंद्राने मंजूर करावा, अशा आशयाचे दोन ठराव करून घेत आहोत. यामुळे आता येणाऱ्या काळात शेतकरी आणि सरकारमध्ये मोठे संघर्ष होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त जागेसाठी आपले नाव न घेण्याची देखील विनंती राज्यपालांना भेटून केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
सनीच्या वाढदिवसाची राज्यात चर्चा!! चांदीची गदा देऊन केला वाढदिवस केला साजरा..
पोस्ट ऑफिस बचत योजनेत 333 रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख मिळवा, जाणून घ्या होईल फायदा..
महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची सेंद्रिय शेती मार्गदर्शनासाठी पंजाबवारी, शेतकऱ्यांना होणार फायदा...
Share your comments