तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव केसीआर यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उतरत आहे. यामुळे सध्या त्यासाठी केसीआर यांनी राज्याच्या विविध भागांत दौरे करण्याचा सपाटा लावला आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राव हे उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी भेट देणार असल्याची चर्चा आहे. यामुळे ते देखील पक्षप्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी देखील राज्यातील अनेक नेत्यांनी या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आधी मराठवाडा, नंतर विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी जाहीर कार्यक्रम घेण्यास सुरूवात केली आहे.
केसीआर यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या तेलंगणा मॉडेलचे भांडवल करत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साद घातली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यामुळे ते यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, तेलंगणानंतर आता त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळला आहे. यावेळी ‘अब की बार किसान सरकार’ चा नारा देत महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात नांदेड, नागपूर आणि सोलापूरमध्ये सभा घेतली होती.
तेरणा इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार धेनू ॲपद्वारे डिजिटल उद्योमीता प्रशिक्षण...
त्यांच्या सभांमध्ये अनेक माजी आमदार-खासदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील ते अनेकांना पक्षात घेणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पीएम किसान योजनेचा अजून एक हप्ता वाढणार? माहिती आली समोर....
पीकविमा भरून मिळवा कुट्टी मशिनचे बक्षीस, विठ्ठल जगताप यांचा पुढाकार...
राज्यात पुन्हा वाढला लम्पीचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांनो काळजी घ्या..
Share your comments