1. बातम्या

इंदापूरातील शेतकऱ्याने शेतात केली अशी करामत की शेती बघून पोलिसही चक्रावले, प्रकरणाची राज्यात चर्चा...

आपल्या शेतीप्रधान देशात आधुनिक काळात शेतीविषयक अनके घडामोडी होत असतात. शिवाय अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग देखील करताना दिसतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग पाहून सर्वच अवाक झाले आहेत.

farm

farm

आपल्या शेतीप्रधान देशात आधुनिक काळात शेतीविषयक अनके घडामोडी होत असतात. शिवाय अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग देखील करताना दिसतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग पाहून सर्वच अवाक झाले आहेत. तर शेतकऱ्याची करामत पाहून पोलीस देखील हैराण झाले. राज्यातील ठिकठिकाणी गांजाची झाडे लावल्यावरून कारवाई झाल्या आहेत. परंतू इंदापूरातील वरकुटे बुद्रुक येथे भुईमूग आणि लसूण शेतीच्या पिकात आंतरपीक म्हणून अफूची शेती करण्यात आली होती.

या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी शेतपिकातून अफूच्या ओल्या बोंडांसह 32 किलो वजनाची झाडे ताब्यात घेतली असून खुल्या बाजारात त्याची 16 लाखांपेक्षा अधिक किमत असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे यांच्या विरोधात इंदापूर पोलिसांत अंमली औषधीद्रव्य व मनुःप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरकुटे बुद्रुक परिसरात बेकायदेशीर आणि विनापरवाना अफु व अंमली पदार्थांची झाले लावली असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पाहणी करून संबंधित प्रकारची खात्री करून पोलीस हवालदार सुरेंद्र जयवंत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. वरकुटे बुद्रुक येथील शेतकरी पांडुरंग नामदेव कुंभार यांची जमीन गट नंबर २४ व नवनाथ गणपत शिंदे विहिरीच्या कडेला जमीन गट नंबर २८/२ मध्ये भुईमूग व लसणाच्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अंमली पदार्थाच्या झाडांची थोड्या थोड्या अंतराने बेकायदेशीरपणे लागवड केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, नागनाथ पाटील, यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत. सध्या अनेक ठिकाणी गांजा देखील लावला जात आहे. यामुळे कारवाई केली जात आहे.

English Summary: farmer Indapur trick field police got confused after seeing farm, matter discussed state Published on: 04 March 2022, 03:13 IST

Like this article?

Hey! I am मनोज रामचंद्र दातखिळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters