अलीकडील काही दिवसात बिहारमध्ये आश्चर्यकारक घटना घडत आहेत. लोकांच्या बँक खात्यात करोडो रुपये जमा होत आहेत. आता अजून एक अशी घटना घडली, मुझप्परपूर जिल्ह्यातील सिंगारी गावातील एक वयोवृद्ध शेतकरी राम बहादूर शाह यांच्या खात्यात तब्बल 52 करोड रुपये जमा झालेत.
शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आलं, जेव्हा शाह हे कठरा येथे CSP मध्ये आपल्या वृद्धत्वाचे पेंशन जमा झाले की नाही ह्या संदर्भात चौकशी करायला गेलेत तेव्हा त्यांना आपल्या खात्यात चक्क 52 कोटी जमा झालेत हे समजलं. CSP चे ऑपरेटरणे जेव्हा शाह च्या अकाउंट मध्ये लॉगिन केले तेव्हा त्या ऑपरेटरला जोराचा झटकाच बसला. पाहता पाहता ही बातमी जंगलात लागलेल्या वणव्याप्रमाणे पंचक्रोशीत पसरली.
ह्या घटनेवर वयोवृद्ध शेतकरी काय म्हणाले
राम बहादूर शाह म्हणाले, "आम्ही गरीब गावकरी शेतीवर आमचा उदरनिर्वाह चालवीत आहोत. मी राज्य सरकारला विनंती करतो की मला काही रक्कम द्यावी जेणेकरून माझे उर्वरित आयुष्य जगायला सोपे होईल आणि आमचा उदरनिर्वाह भागेल."
शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आलं, जेव्हा शाह हे कठरा येथे CSP मध्ये आपल्या वृद्धत्वाचे पेंशन जमा झाले की नाही ह्या संदर्भात चौकशी करायला गेलेत तेव्हा त्यांना आपल्या खात्यात चक्क 52 कोटी जमा झालेत हे समजलं. CSP चे ऑपरेटरणे जेव्हा शाह च्या अकाउंट मध्ये लॉगिन केले तेव्हा त्या ऑपरेटरला जोराचा झटकाच बसला. पाहता पाहता ही बातमी जंगलात लागलेल्या वणव्याप्रमाणे पंचक्रोशीत पसरली.
राम बहादूर शाह ह्या शेतकरीचा मुलगा सुजित म्हणाला की,“माझ्या वडिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यापासुन आम्हाला खुप समस्येला सामोरे जावे लागत आहे. आम्ही शेतकरी आहोत आणि आम्हाला सरकारची मदत हवी आहे. "
“हे पैसे माझ्या वडिलांच्या खात्यात कसे जमा झालेत ते मला माहित नाही पण खात्यात पैसे जमा झाले त्या दिवसापासून बँकेने माझ्या वडिलांना व्याज दिले पाहिजे, ह्या सर्व प्रकरणात आमचा दोष नाही, हा बँकेचा दोष आहे, असे सुजित शहा म्हणाले.
कटराचे पोलीस उप निरीक्षक काय म्हणाले
उपनिरीक्षक मनोज पांडे म्हणाले की,“आम्हाला स्थानिक स्त्रोतांकडून कळले की एका वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यात 52 कोटी रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच संबंधित बँकेला सूचना देण्यात आली आहे आणि ह्या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे, ”
Share your comments