बरेचजण समोरच्या व्यक्तीचे पारक किंवा त्या व्यक्ती विषयी आपले मत हे त्याच्या बाह्यरूपावरून ठरवितात. परंतु आपण ठरवलेले मत आणि समोरची व्यक्ती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडतो. अशीच काहीशी घटना कर्नाटक राज्यातील तुमकुर मध्ये घडले आहे. नेमके काय झाले? याबाबत सविस्तर माहिती या लेखात घेऊ.
कर्नाटक मधील तुमकुर येथे राहणारे शेतकरी त्याच्या एका मित्रासोबत एका कार चे शोरूम मध्ये गेले होते. कारण त्या शेतकऱ्याला कार खरेदी करायची होती. परंतु त्या शोरूम मधील सेल्समनने त्या शेतकऱ्याचे कपडे पाहून शेतकऱ्यांचा अपमान केला आणि त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले.चिक्कासांध्राहोबली मध्ये राहणारे रामनपाल्या के केम्पेगौडाके सुपारीची शेती करतात. त्यांना एसयूव्ही बुक करायचीहोतीत्यामुळे ते कार च्या शोरूम मध्ये गेले. आल्यानंतर त्यांनी तेथे महिंद्रा बोलेरो ची माहिती घेतली. दोन लाख रुपये डाऊन पेमेंट आणि त्यादिवशी डिलिव्हरी देण्यासंदर्भात यांच्यात चर्चा झाली.
परंतु त्या शोरूमच्या सेल्स टीम ने त्याला नकार दिला. त्यावेळी केम्पेगौडायांनी दहा लाख रुपये एकरकमी भरतो असे म्हटले.तेव्हाशोरूमचा सेल्स टीमनेजाणून बुजून शेतकऱ्याची थट्टा केली.थट्टा करताना ते त्यांना म्हणाले की दहा लाख तर दूरच आहेत परंतु तुमच्या खिशात 10 रुपये देखील नसतील. इतकेच नाही तर संबंधित सेल्समनने त्यांना म्हटले की,जर तुम्ही अर्धा तासात दहा लाख रुपये आणले तर ती गाडी आजच तुम्हाला डिलिव्हरी करू. त्यावर केम्पेगौडा यांनी अर्ध्या तासात दहा लाख रुपये जमवले. मात्र त्यानंतर संबंधित शोरूमचा सेल्स टीमने कार डिलिव्हरी साठी किमान तीन दिवस लागतील असे सांगितले.
त्यामुळे केम्पेगौडा व त्यांचे मित्र नाराज झाले व त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांनी संबंधित शोरूम ला घेराव देखील घातला. मध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत समजूत काढली. शोरूमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि शोरूम मधला अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या मित्रांचा अपमान केला आहे पण मला कार नको. लिखित स्वरूपात माफी हवी अन्यथा शोरुम बाहेर आंदोलन करू असा इशारा केम्पेगौडायांनी दिला आहे.
Share your comments