1. बातम्या

खरं काय! वावरात मिळाले सोन्याचे कॉइन; 28 हजाराला विकला गेला एक शिक्का; पण.....

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बक्सरमधील नावानगर येथील मौजे गिरीधर बरावं या ठिकाणी सोन्याचे कॉइंन शेतात सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. असे सांगितले जात आहे की रविवारी मौजे गिरीधर बराव या गावातील एक वयोवृद्ध महिला शेतात लावलेले काटेरी कुंपण बाजूला करत असतांना या महिलेस सोन्याचे कॉईन सापडले.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
सोन्याचे कॉइंन शेतात सापडल्याची घटना उघडकीस आली

सोन्याचे कॉइंन शेतात सापडल्याची घटना उघडकीस आली

प्राचीन काळात भारताला सुवर्ण नगरी म्हणून ओळखले जात होते. असे सांगितले जाते की, भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. यामुळेच की काय भारताला सोने की चिडिया म्हणून संबोधले जाते. "मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती" असे गीत देखील आपण नक्कीच ऐकले असेल. या गाण्यात ज्याप्रमाणे आपल्या देशाची धरणी सोने मोती हिरे देते असे सांगितले आहे अगदी त्याच प्रमाणे आता प्रत्यक्षात धरणीमाता सोने देत असल्याची घटना समोर आली आहे.

बिहारमधील बक्सर जिल्ह्यातुन जमिनीत सोन्याचे शिक्के सापडले असल्याची बातमी वेगाने वायरल होत आहे. याठिकाणी शेतात सोन्याचे कॉईन आढळून आल्याने संपूर्ण देशात एकच चर्चा रंगली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बक्सरमधील नावानगर येथील मौजे गिरीधर बरावं या ठिकाणी सोन्याचे कॉइंन शेतात सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. असे सांगितले जात आहे की रविवारी मौजे गिरीधर बराव या गावातील एक वयोवृद्ध महिला शेतात लावलेले काटेरी कुंपण बाजूला करत असतांना या महिलेस सोन्याचे कॉईन सापडले.

हरिहर साह यांची ही शेतजमीन आहे त्यांनी ही शेतजमीन बिहसी देवी या वयोवृद्ध महिलेस तोडबटाई पद्धतीने जमीन कसण्यास दिली आहे. त्यामुळे ही महिला शेतजमिनीची साफसफाई करत होती यावेळी या महिलेस 4 सिक्के सापडले. ही वयोवृद्ध महिला सापडलेले चारी सिक्के घेऊन घरी गेली. या महिलेस सोन्याचे शिक्के सापडल्यानंतर सत्यम सिंग या इसमाने या महिलेकडून एक शिक्का घेऊन घेतला.

उरलेल्या तीन कॉइन पैकी एक कॉईन पोलिसांना दिला आणि उर्वरित दोन सिक्के विहिरीत टाकले असल्याचे सांगितले. गावात हि बातमी समजल्यानंतर गावातील नवयुवक घटनास्थळी पोहोचले आणि तेथे खोदकाम सुरू केले त्यावेळी दोन युवकांना देखील एक-एक सोन्याचा शिक्का सापडला.

सत्यमसिंग या इसमाने वृद्ध महिलेकडून घेतलेला सिक्का सोनार शिवकुमार यास विक्री केला सोनारने हा सिक्का तोडून त्याची चौकशी केल्याचे उघड झाले आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की सत्यमसिंग याने सोनारास 27 हजार 500 रुपयाला एक सिक्का विक्री केला. तर दुसरीकडे त्याच गावातील सरोज पाल याने देखील रात्री खोदकाम केले आणि त्याला एक शिक्का सापडला. तो कॉइन देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

शेतात एकूण सहा कॉइंन सापडलेत त्यापैकी पोलिसांकडे 3 कॉइन जप्त झाले आहेत. शेतात सोन्याचे शिक्के सापडत आहेत म्हणून गावातील नागरिक हा देवाचा चमत्कार आहे असे म्हणू लागले. ही बातमी वनव्याप्रमाणे पसरू लागल्याने पंचक्रोशीतील तमाम लोक या गावात येऊ लागले आहेत.

सोशल मीडिया मध्ये देखील ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बातमी सोनवर्षाचे प्रभारी प्रियश प्रिदर्शी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तीन सिक्के हस्तांतरित केले आहेत. यासोबतच त्यांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावून दिला असून याची माहिती पुरातत्व विभागास दिली आहे.

English Summary: farmer get golden coin in farm read more about it Published on: 21 March 2022, 09:44 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters