2014 मध्ये भारतात सत्तापरिवर्तन झाले 70 वर्षे शासनात असलेले काँग्रेस सरकारला भाजप सरकारने रिप्लेस केले. 2014 पासून आज पर्यंत केंद्रातील मोदी सरकारने अनेक धडाडीचे निर्णय घेतले, तसेच अनेक कल्याणकारी योजना देखील अमलात आणल्यात. याच कल्याणकारी योजना पैकी एक आहे पीएम किसान सम्मान निधि योजना. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना सरळ बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.
हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना तीन हत्यात ट्रान्सफर केले जातात. आता पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असे सांगितलं जात आहे. अनेक मीडिया रिपोर्टच्या अनुसार नववर्षाच्या आनंदमयी वातावरणात सरकार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हफ्ता देणार आहे. पण शेतकऱ्यांना हा दहावा हफ्ता प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे, असा अनेक मीडिया हाऊसेसने दावा केला आहे.
या तारखेला मिळणार दहावा हफ्ता
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 1 जानेवारी 2022 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील, असे देशाचे कृषी मंत्री माननीय श्री नरेंद्रजी तोमर यांनी स्पष्ट केले. नरेंद्र जी तोमर साहेब यांनी असे देखील म्हटले की, यावेळी एफपीओसाठी देखील इक्विटी अनुदान माननीय मोदी साहेबांद्वारे देण्यात येणार आहे.
काय येत आहेत अडचणी
असे सांगितले जात आहे की, ई-केवायसी केल्याशिवाय पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. म्हणून शेतकरी ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट pmkisan.gov. in यावर जात आहेत. परंतु शेतकरी ई-केवायसी करण्यासाठी या साइटवर लॉग इन करतात पण मात्र ई-केवायसी होत नाहीये
ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर लॉगिन केली असता, शेतकऱ्यांना इनव्हॅलिड ओटीपी आणि रेकॉर्ड नोट फाऊंड असा प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची ई-केवायसी अजूनही बाकीच राहिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी समोर येत आहे की, कृषी विभागला शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीची माहिती देण्यात आली आहे आणि लवकरच, विभाग लवकरच ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर सुधारणा करेल असे सांगितले जात आहे.
Share your comments