महाराष्ट्रात सर्वदूर अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सारखे प्रकार होऊननद्यांना आलेल्या पुरामुळे प्रचंड प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे.
आलेल्या नैसर्गिक संकटाने शेतकरी राजा पूर्ण खचलेला आहे.सगळ्यात पिकांचे नुकसान होऊनमालाची प्रत खालावल्याने त्याचा परिणाम भावावर दिसत आहे.तसेच या जास्तीच्या पावसाने अनेक रोगांचाप्रादुर्भाव पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.या सगळ्या परिस्थितीला केळी हे पीक देखील अपवाद नाही.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देळुब(बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनीआपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावरील केळीचे पीक कोयत्याने तोडून भुईसपाट केले आहे. या प्रकाराला शासनाने गांभीर्याने घेऊन त्याचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शैलेश लोमटे यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याचा विचार केला तर नेमक्या काढणीस आलेल्या केळीच्या संपूर्ण बागाच्या बागा शेतात पिकून उध्वस्त होत आहेत. ज्या काही केळीच्या बागा या संकटातून वाचले आहे त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. हे संकट येथेच न थांबता वाचलेल्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यातच केळीचे भाव घसरल्याने केळी पिकाचा लागवड खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे.त्यामुळेया परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत
.मागच्या वर्षाची कोरोना मुळे लागलेला लोक डाऊन च्या काळात विविध प्रकारची पिके संकटात सापडली अशाही परिस्थितीत संकटांना तोंड देत शेतकरी मोठ्या धैर्याने वाटचाल करीत होते परंतु या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे व शेतकरी संकटात सापडले आहेत.अशा सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी पुरते खचले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Share your comments