1. बातम्या

मायबाप सरकार जागे व्हा! आपल्या महाराष्ट्रात जलसमाधी घेतोय जगाचा पोशिंदा

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
farmer

farmer

महाराष्ट्र पराक्रमाची भूमी, महाराष्ट्र यशाची भूमी, महाराष्ट्र विरांची भूमी, महाराष्ट्र क्रांतिकारकाची भूमी, महाराष्ट्र बळीराजांची भूमी; मग अशा पवित्र भूमीत असं का घडतेय की जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला जलसंमाधी घेण्यास भाग पडतेय. आपल्या मराठवाड्यात अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे सर्वीकडे त्राहिमाम त्राहिमाम माजलाय. विशेषकरून मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी हैराण झाले आहेत आधीच पुरामुळे, पाऊसामुळे बेचैन शेतकरी आता सरकारी धोरणांमुळे हतबल झालेले दिसत आहेत. पुरामुळे शेतकर्‍यांचे सर्वकाही जणु उद्ध्वस्तच झाले आहे. व

वर्षभराच्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर, घामावर वरुणराजा पाणी फिरवून गेला. तरीही मायबाप सरकार डोळे लावून झोपलेय असं संतप्त शेतकरी आपले मत व्यक्त करत आहेत. आणि ह्यासाठी शेतकरी, सरकारने अद्याप नुकसानभरपाईसाठी कोणतीही कारवाई केलेली नाही ह्या गोष्टीचा दाखला देत आहेत. मायबाप सरकारचे डोळे उघडावे आणि अशा ह्या कठीण प्रसंगी डोळ्यात तेल घालून काम करावे म्हणुन त्यामुळे आता शेतकरीराजा आंदोलनावर उतरला आहे आणि आपला हक्क हिसकावल्याशिवाय मिळणार नाही हे तो जाणुन चुकला आहे.  त्यामुळे औरंगाबादमध्ये एक शेतकरी आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एका अनोख्या आणि हृदय विदारक आंदोलन करण्यासाठी तयार झाला, ह्या शेतकऱ्याने चक्क आपला हक्क मिळावा म्हणुन एका तलावात जलसमाधी आंदोलन करण्याचे ठरवले आणि त्याने हे मन पिळवून टाकणारे आंदोलन सुरु केले. त्याची मागणी आहे की सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.

कोण आहेत हे शेतकरी आणि काय आहे त्यांची मागणी

जलसंमाधी आंदोलन करणारे ह्या शेतकरीचे नाव सलीम अली असे आहे. हे युवा शेतकरी सांगत आहेत की, "अतिमुसळधार पावसामुळे आमचे संपूर्ण पीक उध्वस्त झाले, आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे, त्यामुळे आता सरकारकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मी करत आहे." गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळीही वाढली आहे. ह्या शेतकऱ्यांने मायबाप सरकारला आपला हक्क नाही मिळाला तर आपण विष प्राशन करू असा इशाराही दिला. पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, असं ह्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनास्थळी हजर असलेल्या पोलीस आणि आजूबाजूच्या लोकांनी त्या शेतकऱ्याला तलावातून बाहेर काढले.

 

 मराठवाड्यात पावसाचा त्राहिमाम

मराठवाड्यात गेल्या चार महिन्यांत मुसळधार पाऊस झाला आणि ह्या पाऊसामुळे 91 जणांचा बळी गेला आहे. ह्या पाऊसामुळे जीवितहानी व्यतिरिक्त लागवडीखालील शेतीचेही नुकसान झाले आहे, ह्यामुळे जवळपास 25 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात यावर्षी 1,041.5 मिमी पाऊस पडला, त्यापैकी पावसाळ्यात 679.5 मिमी एवढा पाऊस पडला.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters