लातूर:केंद्र सरकारने पिक विमा योजना ही मुळातच नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले तरया विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी सुरू केलेली योजना आहे.
परंतु बऱ्याचदा याच्या विरुद्ध परिस्थिती पाहायला मिळत आहे.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे विमा कंपन्यांकडून या नुकसान भरपाईपोटी विम्याचे पैसे मिळावे यासाठी शेतकरी चातकासारखी वाट पाहत असतानापिक विमा कंपन्यांचा मनमानी कारभार यामुळे सबंध राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत.खरीप हंगामामध्ये पिक विमा भरून देखील या योजनेचा लाभ मिळत असल्याने शेतकरीदुहेरी संकटात आहेत.या पार्श्वभूमीवर खलंग्री येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.पीक विम्याचे पैसे द्या नाहितर जिल्हाधिकारी कार्यालयातच सामूहिक आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी द्रव्ये हातामध्ये घेऊन प्रवेश केला.शेतकऱ्यांची ही आक्रमकता पाहून जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आणि तीन दिवसांमध्ये विमा रक्कम अदा केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.त्यामुळे हा अनेक दिवसांपासून रखडलेल्या प्रश्न मार्गी लागण्याची आशानिर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची ही आक्रमकता पाहून जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढलेला असून चार मार्च पर्यंत विमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे पत्र देखील एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिले आहे जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिले आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन जरी अर्ज केला असेल तरी त्यांनाही भरपाई मिळणार आहे.( स्त्रोत-Tv9मराठी)
Share your comments