शेतकऱ्यांना सध्या शेती करण्यासाठी कर्जाची गरज असते. अनेकदा भांडवल नसल्याने शेतकरी शेती करण्याचा प्रयत्न बंद करतो. मात्र शेतीशिवाय पर्याय नाही शेती ही करावीच लावणार आहे. शेती केली तरच जग जगणार आहे.
यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही एक महत्वाची योजना आहे. (Mahatma Phule Farmer Loan Waive Scheme) या अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड (Loan Repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ (Farmer Incentive Benefit Scheme) देण्यात येणार आहे.
यामध्ये राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, परभणी, सांगली, सोलापूर, ठाणे आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शंभर टक्के कर्जदार शेतकरी प्रोत्साहन योजनेसाठी पात्र ठरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
शेतकऱ्यांना दिलासा! पीक नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार..
राज्यातील २९ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अपेक्षित २३ लाख ५ हजार ८६५ कर्जदारांपैकी २२ लाख ६७ हजार ५४२ कर्जदार शेतकरी प्रोत्साहन योजनेत आले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ४९९६१ कर्जदार सभासद लाभार्थी ठरले आहेत.
द्राक्ष आणि डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन, शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन..
अल्पमुदत पीककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांना याबाबत अजूनही नियम आणि अटी माहिती नाहीत. शेतकरी संघटनेने यावर आवाज उठवला आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोबाईलने जमीन किंवा शेत कसे मोजायचे? वाचा साधी आणि सोप्पी पद्धत.
वेदांता प्रकल्पासाठी तळेगावात 6 हजार एकर जमीन संपादित, सातबारावर एमआयडीसीचा शिक्का, शेतकऱ्यांना मोबदला, वाचा खरी कहाणी
lumpy disease: लम्पीचे थैमान! कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात अनेक जनावरांचा मृत्यू, वाचा महाराष्ट्रातील परिस्थिती..
Share your comments