केंद्रातील सरकारशी झालेल्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटनांनी आपला पवित्रा आक्रमक केला आहे. सरकार कायदा रद्द करण्यास तयार नाही तर शेतकरी संघटनाही आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यामुळे आंदोलन आता परत चिघळणार असून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आता आजपासून अन्नत्याग करणार आहेत. या आंदोलनात दिल्ली, जयपूर आणि दिल्ली आग्रा महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलकांनी जाहीर केलेल्या १९ पासूनच्या बेमुदत उपोषणाला तूर्त स्थगिती देण्यात आली असून आज एका दिवसाचे लक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.
आज सकाळीपासून ८ ते सांयकाळ पाच वाजेपर्यंत उपोषण केले जाणारे असल्याची माहिती शेतकरी नेते गुरुनाम सिंग चढुणी यांनी माध्यमांना दिली. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार कट -कारस्थान करत आहे. आंदोलनात सहभागी सर्व शेतकरी संघटना एकत्रिते आहेत. तीनही कायदे रद्द करावेत ही मागणी कायम आहे.दरम्यान शेतकरी संघटनांचे नेते आणि सरकार यांच्यातील पुढच्या फेरीची चर्चा पुढच्या एक दोन दिवसात होईल, अशी शक्यता आहे. शेतकरी संघटना एमएसपी आणि बाजार समित्यांवरील कायदा दुरुस्त्या बाबत ठाम आहेत. आणि या दुरुस्त्या संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच करण्याचे आश्वासन सरकारकडून दिले जाऊ शकते.
शेतकरी आंदोलनकांनी रविवारी दिल्ली- जयपूर आणि दिल्ली आग्रा हे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले. त्यामुळे काही काळ या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विविध भागांतील बंदोबस्त कडेकोट करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी येणारे रस्ते आयटी आणि गुरुद्वारा टपाल कार्यालय यासर्व भागांमधून अडथळे लावून काटेकोर तपासणीला सुरुवात केली आहे. शेतकरी संघटनांनी सोमवारपासून बेमुदत अन्नत्याग करण्याचा इशारा दिला आहे.
गुरु गोविंद साहेब यांच्या बलिदान दिनापासून हे आंदोलन करण्यात येईल, असे संघटनांनी जाहीर केले आहे. दिल्लीतील सत्तारुढ आम आदमी पक्षाने तसेच अनेक राजकीय पक्षांनीही या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे हमीभाव आणि तीनही कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे.दरम्यान कृषी कायदे मंजूर करण्याआधीच शेतीमालाच्या गोदामांची उभारणी करण्याते आल्याने हा प्रकार संशस्यास्पद आहे. असे प्रकार भारतात होऊ दिले जाणार नाही,असा इशारा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिला आहे. दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर,केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. पण यातील तपशील बाहेर आलेला नाही.
Share your comments