या हंगामात कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव प्राप्त झाला, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांचा आनंद गगनात मावत नाहीय. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे व बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामात कापूस समवेतच इतर सर्व पिकांवर रोगांचे सावट बरकरार राहिले होते. कापूस पिकावर अतिवृष्टीचा सर्वात जास्त प्रभाव नजरेस पडला, अतिवृष्टीमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे कापूस पिकावर संपूर्ण हंगाम भर बोंड आळीचा प्रादुर्भाव कायम राहिला होता. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट घडून आली याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या रुईचे आणि सरकीचे बाजार भाव गगनाला भिडलेत त्यामुळेदेखील कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाले असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे मात्र असे असले तरी कापसाच्या दरात तेजी कायमच आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाला तर विक्रमी बाजारभाव प्राप्त होतच आहे शिवाय फरदड कापसाला देखील या वेळी बाजारात मोठी मागणी असून फरदड कापूस देखील आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होतानाचे चित्र बाजारपेठेत बघायला मिळत आहे. त्यामुळे खानदेश समवेतच राज्यातील इतर भागातही कापूस उत्पादक शेतकरी अद्यापही फरदड कापसाचे उत्पादन घेताना नजरेस पडत आहेत. फरदड कापसाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने संपूर्ण वेचणी झालेल्या कापसाच्या पराठ्या अद्यापही वावरातच नजरेस पडत आहेत आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फरदड कापसाच्या उत्पादनाची आशा आहे. मात्र असे असले तरी कृषी विभागाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचे फरदड उत्पादन घेण्यास मनाई केली आहे
कृषी विभागाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला दिला की वेचणी झालेल्या कापसाच्या पऱ्हाट्या शेतकरी बांधवांनी समूळ नष्ट कराव्यात. मात्र कृषी विभागाने वारंवार सांगून देखील कापूस उत्पादक शेतकरी फरदड कापसाच्या मोहाला बळी पडताना राज्यात सर्वत्र दिसत आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कापसाचे फरदड उत्पादन घेतल्याने पुढील हंगामासाठी बोंड आळीला पोषक वातावरण तयार होते त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोह आवरता घ्यावा आणि कापसाचे वावर रिकामी करून त्याच जागी इतर पिकांची लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी.
गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या याच मोहामुळे राज्यात कापसावर बोंड आळीचे सावट कायम राहिले आहे. फरदड कापसाचे उत्पादनामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हात खर्चासाठी पैसे उपलब्ध होतात खरे मात्र यामुळे आगामी हंगाम पुरता संकटात सापडत असतो त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापसाचे क्षेत्र रिकामे करावे आणि मागच्या हंगामातील पऱ्हाट्या लागलीच जाळून नष्ट कराव्यात.
Share your comments