कापसाच्या उत्पादनात या हंगामात विक्रमी घट घडून आली याचाच परिणाम म्हणून यंदा कापसाला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याचे सांगितले जात आहे. मागणी असली म्हणजे मग मालाला दर्जा नसला तरीदेखील त्याची विक्रमी दरात विक्री होत असते कापसा बाबत देखील यंदा हीच परिस्थिती लागू होताना बघायला मिळत आहे.
खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली उत्पादनात घट आणि जागतिक बाजारपेठेत वाढलेली मागणी या मुळे कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळत आहे, हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला विक्रमी दर मिळत आहे आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या कापसाला दहा हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत असून सुरुवातीपासूनच हा दर टिकून असल्याचे बघायला मिळाले.
राज्यात सर्वत्र आता कापसाचा हंगाम संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सुरुवातीच्या वेचणीचा कापूस आता जवळपास संपला असून परभणी जिल्ह्यात आता फरदड कापसाची बाजारात आवक होत असल्याचे बघायला मिळत आहे. फरदड कापसामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो, याव्यतिरिक्त, जमीन नापीक होण्याचा धोका असल्याचे देखीलकृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मात्र शेतकरी बांधवांनी आगामी काळात होणारे नुकसान नजरेआड करून अधीकचा दर प्राप्त होत असल्याने कापसाचे फरदड उत्पादन घेण्यास काटकसर केलेली दिसत नाही. परभणी जिल्ह्यात फरदड कापसाला दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत असल्याचे परभणी एपीएमसीच्या सूत्रांनी सांगितले.
यामुळे परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हात खर्चाला पैसे होतील या हेतूने सर्रासपणे फरदड कापसाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. यावरून मागणी असली की खराब मालाला देखील अधिकचा दर मिळतो हे स्पष्ट झाले आहे.
शेतकरी मित्रांनो फरदड कापसाचा दर्जा हा चांगला नसतो, मात्र असे असले तरी हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला असलेली मागणी आता अंतिम टप्प्यात ही कायम असल्यामुळे फरदड कापसाला चांगला दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे साठवलेला कापूस आता विक्री करून टाकला आहे.
आता बाजारपेठेत दाखल होणारा कापूस हा फरदड उत्पादनाचाचं आहे. दरवर्षी चांगल्या कापसाला देखील जो दर मिळत नव्हता तो दर या हंगामात फरदड उत्पादनातील कापसाला मिळत असल्याचा दावा परभणी एपीएमसी मधील सूत्रांनी केला आहे. उन्हाळी हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी इतर पिकांची लागवड करण्यापेक्षा कापसाचे फरदड उत्पादन घेण्यास पसंती दर्शवली आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फरदड कापसाचे उत्पादन देखील चांगला पैसा मिळवून देत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी कापसाच्या फरदड उत्पादनामुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यामुळे इतर पिकांवर देखील बोंड आळी शिरकाव करत असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच कापसाचे फरदड उत्पादन घेतल्यास रब्बी हंगामातील पिकांना फटका बसू शकतो.
एवढेच नाही तर कृषी तज्ज्ञांच्या मते कापसाचे सरदार उत्पादन घेतल्यास जमीन नापीक होण्याचा धोका कायम असतो, यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना कापसाचे फरदड टाळण्याचा सल्ला देखील दिला होता मात्र फरदड कापसाला देखील उच्चांकी बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीची पर्वा न करता सर्रासपणे कापसाचे फरदड उत्पादन घेतल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या:-
खरं काय! मोदी सरकार कृषी कायदे मागच्या दाराने का होईना लागू करेलच; सीताराम येचुरी यांचा गंभीर आरोप
Share your comments