1. बातम्या

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन, कृषी विभाग

KJ Maharashtra
KJ Maharashtra
fal pik vima

fal pik vima

 प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 ते 23 -24 या तीन वर्षाच्या कालावधीत करतात फळबागांच्या मुर्ग आणि आंबिया बहारा करता लागू करण्यात आली आहे. फळपिकांसाठी  असलेली ही योजना  कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असून या योजनेत मृग बहारातील मोसंबी, चिकू, डाळिंब, पेरू, सीताफळ आणि लिंबू या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

 या योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळ  स्थर क्षेत्र घटक धरून आधी सूचित असलेल्या मंडळांमध्ये ही योजना राबवण्यात येणार. या योजनेमध्ये कमी पाऊस, पावसाचा जास्त खंड, अतिवृष्टी, हवामानातील जास्त आद्रता या वातावरणीय धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरवण्यात येणार आहे.

ही योजना सर्व कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून अधिसूचित केलेल्या फळांपैकी एक फळपिकासाठी एका वर्षाला एकाच क्षेत्रावर मुर्ग अथवा अंबिया बहरा पैकी कोणत्याही एका हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. जे शेतकरी स्वतःच्या सहीसह योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणा पत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा या योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल.

 विविध फळ पिकांना करिता  असलेली विमा हप्ता रक्कम आणि विमा संरक्षित रक्कम खालील प्रमाणे

  • पेरू- विमा संरक्षीत रक्कम साठ हजार रुपये आणि विमा हप्ता रक्कम तीन हजार रुपये
  • लिंबू साठी विमा संरक्षित रक्कम 70 हजार रुपये प्रति हेक्टर आणि विमा हप्ता रक्कम 3500 रुपये
  • मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित  रक्कम 80 हजार रुपये प्रति हेक्‍टर आणि विमा हप्ता रक्कम चार हजार रुपये

 चिकू फळासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये प्रति हेक्‍टर आणि विमा हप्ता रक्कम सात

वरील सर्व फळपिकांसाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत आहे.

 

  • डाळिंब साठी फळ पीक विमा संरक्षित रक्कम एक लाख तीस हजार रुपये प्रति हेक्‍टर आणि विमा हप्ता रक्कम सहा हजार पाचशे रुपये

 

डाळिंब पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याचे अंतिम तारीख 14 जुलै 2021 ही आहे.

 

  • सिताफळ फळपिकासाठी विमा संरक्षीत रक्कम पंचावन्न हजार रुपये प्रति हेक्‍टर आणि विमा हप्ता रक्कम दोन हजार 750 रुपये

 

सिताफळ पिकासाठी सहभागी होण्याचे अंतिम मुदत 31 जुलै 2021 ही आहे.

 

 अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी ई-मेल -pikvima@aicofindia.com किंवा टोल फ्री नंबर 1800 2660 700या वर संपर्क साधावा तसेच नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय  कृषी अधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी या योजनेबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकते. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters