कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. असे असताना मात्र यामध्ये काळाबाजार होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या (Market commettee)आणि खरेदीदार व्यापाऱ्यांनी कांदा अनुदान लाटण्यासाठी टक्केवारीनुसार बनावट नोंद करून पावत्या तयार केल्या आहेत. याची सखोल चौकशी करून दोषी बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विठेवाडी येथील शेतकरी सुनील सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
याबाबत शेतकरी तक्रार करत होते. त्यांनी नमूद केल्यानुसार, जिल्ह्यात कांदा आवक होणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांनी संगनमताने कांदा अनुदान लाटण्यासाठी बनावट व्यवहार दाखवून गैरप्रकार केला आहे, असे म्हटले आहे. तसेच अनुदानाचे लाभार्थी होण्यासाठी पैसे घेऊन बनावट पावत्या तयार करून दिलेल्या आहेत.
शेतकऱ्यांनो उन्हाळ्यात पंजाब-हरियाणामधून गाय खरेदी करू नका, गाईंचा होतोय मृत्यू...
यामुळे व्यापाऱ्यांची चौकशी करावी. अशी मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोनवणे हे उपोषणाला बसले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने हे उपोषण मागे घेत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
मुंबई डेंजर झोनमध्ये, महाराष्ट्रात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू..
बनावट पावत्या तयार केलेल्या दिवसाचे व्यापारी वर्गाचे बँकखाते तपासावे, खरेदी केलेला कांदा यांनी कुठे दिला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता शेतकरी मुलाशी लग्न केल्यास 2 लाख रुपये मिळणार...
या पिकाचे तेल 20 हजार रुपये प्रति लिटर, दर चार महिन्यांत 1 लाखाची कमाई..
पोल्ट्री मधल्या तब्बल 13 हजार कोंबड्या अवकाळीच्या फेऱ्यात मृत्यूमुखी, क्षणात झालं होत्याच नव्हतं..
Share your comments