सोशल मीडियावर असंख्य प्रकारचे मेसेज व्हायरल होत असतात. परंतु याच यातले बरेचसे मेसेज खरे असतात असे नाही. बरेचसे मेसेज हे खोटे आणि अफवा पसरवणारे असतात. सध्या अशा असंख्य मेसेज पैकी एक मेसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे, तो म्हणजे रेशन कार्ड वर तीन महिने धान्य खरेदी केले नाही तर रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते अशा प्रकारचा हा मेसेज आहे. परंतु रेशन कार्ड रद्द होणार याबाबत पुरेशी माहिती घेतल्यानंतर खाल्ले की हा मेसेज खोटा असल्याची समोर आले आहे. या प्रकारचे मेसेज वर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिला आहे की, रेशन कार्ड तीन महिने धान्य खरेदी केले नाही तर कार्ड रद्द होणार अशी बातमी काही दिवसांतील पसरली होती. ही बातमी धादांत खोटी असल्याचे सरकारने म्हटले आहे. भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पी आय बी फॅक्ट चेक ने या दाव्याबाबत याबाबत तपास केला असता सत्य समोर आले आहे. हे माहिती खोटे आणि निराधार असल्याचे पी आयबीने म्हटले आहे.
पी आय बी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाउंट वरून याबाबत माहिती दिली की रेशन कार्ड वर तीन महिने धान्य खरेदी केले नाही तर ते रद्द करण्यात यावे अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. हा मेसेज जोरदार सोशल मीडियावर वायरल होताना दिसत होता. मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारला कोणतीही सूचना दिली नाही हे वृत्त खोटे असल्याचे पी आय बी ने म्हटले आहे. तसेच विज बिल 1 सप्टेंबर पासून मापहोणार आहेत असे मेसेज व्हायरल होत होता, परंतु ते देखील खोटे असल्याचे म्हटले आहे..
अशा प्रकारच्या कोणत्याही योजना सरकार आणणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. अशा खोट्या बातम्या पासून सावध राहण्याचा इशारा देखील पी आयबीने दिला आहे. त्यामुळे अशा वायरल होणाऱ्या खोट्या बातम्या वर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि असले मेसेज चे सत्यता पडताळूनच मेसेज फॉरवर्ड करावेत.
Share your comments