महाप्रलयंकारी चक्रीवादळ फोनी

Thursday, 02 May 2019 07:42 AM


नवी दिल्ली:
बंगालच्या उपसागरातील महाप्रलयंकारी चक्रीवादळ ‘फोनी’ गेल्या सहा तासात ताशी 10 किलोमीटर वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला सरकत असून आज सकाळी साडेपाच वाजता ओदिशातल्या पुरीपासून 680 किलोमीटरवर तर आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमपासून 430 किलोमीटर अंतरावर केंद्रीत होत. येत्या 12 तासात हे वादळ आणखी उत्तर-पश्चिम दिशेला सरकून येत्या 3 मे रोजी गोपाळपूर आणि चंदबलीदरम्यान ओडीशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी 175 ते 185 किलोमीटरदरम्यान जाण्याची शक्यता आहे.

इशारा:

फोनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • उत्तर आंध्रप्रदेश- उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर (श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयानगरम जिल्हे) उद्या (2 मे) तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. याच भागात 3 मे रोजीही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
  • ओडीशा- दक्षिण ओदिशा किनारपट्टीवर उद्या (2 मे) तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. तटीय ओडीशा आणि ओदिशाच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी अति मुसळधार (>20 सेंमी) पाऊस पडण्याचा इशारा.
  • पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालच्या किनारी तसेच अंतर्गत भागात 3 मे रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता.
  • अरुणाचल प्रदेश आणि आसाम-मेघालय- अरुणाचलप्रदेश आणि आसाम-मेघालयात 4 आणि 5 मे रोजी बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता, काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा.

वाऱ्याचा वेग:

  • येत्या 24 तासात उत्तर तामिळनाडू, पुद्देचरी आणि तटीय दक्षिण आंध्रप्रदेशात प्रति तास 180 ते 190 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. वाऱ्याचा वेग 210 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता.
  • उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशा किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग प्रति तास 40 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता. 3 तारखेला ओडीशा किनारपट्टी आणि उत्तर आंध्र प्रदेशात वाऱ्याचा वेग ताशी 115 किलोमीटर वाढण्याची शक्यता.

समुद्राची स्थिती:

  • 2 ते 4 मे दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी तसेच ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहील.
  • मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला असून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्यांना किनारपट्टीवर परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फनी फोनी foni fani cyclone वादळ Odisha ओडीशा

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.