नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे थंडीचे प्रमाणत अचानक वाढ झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पाऊसामुळे गारठा वाढला आहे. यामुळे तापमानात मोठी घसरण झाली आहे. नाशिकमध्ये ७.१ तर निफाड येथे मध्ये ६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
थंडीचा द्राक्षबागांवर होणार परिणाम
नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा फटका द्राक्ष पिकाला बसतोय. निफाडसारख्या द्राक्षाच्या पट्ट्यातच विक्रमी थंडी पडली आहे. बागांमध्ये शेकोट्या पेटवून शेतकरी ही द्राक्ष बाग वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात. द्राक्ष पीक हे ऐन थंडीच्या हंगामात बहरण्यास सुरुवात होते. सलग पाच-सहा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, द्राक्ष झाडाची मुळे चोकअप होणे, द्राक्ष झाडात साखर उतरण्याची प्रक्रिया पूर्णत: थांबणे अशा समस्यांना शेतकर्यांना तोंड द्यावे लागत आहे.
द्राक्षबाग वाचवण्यासाठी उपाययोजना
दहा अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास द्राक्ष बागेसाठी अडचणींचे असते. त्यासाठी मातीचे कमी झालेले तापमान संतुलित ठेवण्यासाठी सिंचन व्यवस्थापन व शेकोट्या करणे महत्त्वाचे ठरते. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना दरवर्षी करावा लागतो. यंदा थंडीचे प्रमाण वाढले असून यामुळे आमच्या निर्यातक्षम द्राक्षांवर थेट परिणाम होत आहे. या थंडीतून द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब निर्माण करण्याचे काम दररोज मध्यरात्री तसेच पहाटे शेतकरी करत आहेत.
या पिकांसाठी थंडी लाभदायक
गेल्या आठवड्यात सरासरी किमान तापमान १२ अंश सेल्सिअस एवढे होते. रविवारी त्यात मोठी घट झाली. सोमवारी (ता.१०) सकाळी वातावरण निरभ्र, सूर्यप्रकाशीत होते. तापमानातील घट रब्बी पिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. गहू निसवणीवर आहे. तर मका, हरभरा वाढीच्या अवस्थेत आहेत. हरभरा पिकाला थंडीची गरज आहे. घाटे लगडले असून, ते पक्व होत आहेत. पण तापमानातील घाटी केळीने पिकाचे नुकसान होऊ शकते. पिकात करपा रोग वाढून वाढ खुंटू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
Share your comments