सध्या ऊस तोडणीच्या हंगाम सुरु असून ऊसतोड मजूर (Sugarcane Labor) तसेच तोडणी यंत्रचालकांकडून (Sugarcane Harvester) एकरी पाच ते सहा हजार रुपये घेण्याचा प्रकार राजरोस सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून आपला ऊस तुटला जाणार की नाही, यामुळे शेतकरी देखील भीती पोटी पैसे देत आहेत.
गेल्यावर्षी अनेकांचा ऊस शिल्लक राहीला होता, सध्या उसाचा हंगाम (Sugarcane Season) वेगात सुरू असून, ऊस वेळेत तुटावा (Sugarcane Harvesting) यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. अजून अनेक कारखान्यांची आडसाली ऊसतोडणी सुरू आहे. यामुळे पूर्व व सुरू हंगामातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.
सातारा जिल्ह्यात सध्या उसाचे क्षेत्र वाढत जाईल त्याच प्रमाणात जिल्ह्यातील कारखान्यांच्या संख्येत वाढ होत गेली आहे. सध्या १६ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. असे असले तरी उसाचे गाळप उरकणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? संजय राऊतांच्या आरोपाने उडाली खळबळ
माण, खटाव तालुक्यांतही उसाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आडसाली उसाचे क्षेत्र वाढ झाल्याने अनेक कारखान्यांचे गाळपाचे गणित चुकले आहे. यामुळे शेतकरी नाराज आहे.
मार्च महिन्याच्या अगोदर ऊस गेल्यावर पीककर्ज नवेजुने करण्यास मदत होत असल्याने मार्च महिन्याच्या अगोदर ऊस तुटून बिले जमा व्हावी, असा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. मात्र ऊसच न तुटल्याने सध्या शेतकरी अडचणीत आला आहे.
Cashew: आफ्रिकेतील काजू, पंढरपूरमध्ये प्रक्रिया, ओझेवाडीचा शेतकरी मोळवतोय लाखोंचा फायदा..
ऊस तुटावा यासाठी नाइलाजास्तव शेतकऱ्यांकडून पैसे द्यावे लागत आहेत. हे प्रकार राजरोसपणे सुरू असतानाही कारखाना व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एरंडीची लागवड आहे खूपच फायदेशीर, दुर्मिळ होत असताना मिळेल फायदा
अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
उन्हाळ्यात नाकातून होणारा रक्तस्राव टाळा
Share your comments