पुणे ६ : मागच्या महिन्यात बंद करण्यात आलेली अतिरिक्त दूध खरेदी योजना चालू राहणार आहे या योजनेला ठाकरे सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा तवतः निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात राज्य दूध उत्पादक संघ अडथत महानंदने अतिरिक्त दुधाची खरेदी करण्यासाठी एप्रिलमध्ये ही योजना चालू केली होती. या योजनेअंतर्गत ६ कोटी लिटर दूध या काळात संकलित केले. ही सहा कोटी दुधाची मर्यादा संपल्याने ही योजना बंद करत आहोत असे महानंदतर्फे सांगण्यात आले.
ही योजना संकट सापडलेल्या शेतकफी वर्गासाठी एक दिलासा देणारी बाब होती. परंतु ही योजना बंद झाल्याने आता शेतकरी हवालदिल झाला होता. कोल्हापूर येथील शाहूवाडी येथील शेतकरी अमोल पाटील म्हणाले की, कोरोनामुळे आमचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. एवढे दूध खरेदी करायला कोणी तयार नाही. संघ पडून दर देतो. अशा परिस्थितीत राज्य सरकार आमचे आशास्थान होते. पण आता ही योजना बंद झाल्याने आमचे अधिकच नुकसान होणार आहे. मागच्या काही दिवसात शेतकऱ्यांनी दुधाला अनुदान देण्यासाठी आंदोलने केली होती. कोल्हापूर, सांगली भागात ट्रकमधून दूध जमिनीवर सोदन्हात आले होते.
Share your comments