1. बातम्या

आनंदाची बातमी : बँकेची कर्जमर्यादा वाढवली; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

कोरोना काळात शेतकरी अडचणीत सापडला. शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅंकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, तसेच त्यांची सावकारी जाचातून मुक्तता व्हावी यासाठी निर्णय घेतला आहे.

Bank

Bank

कोरोना काळात शेतकरी अडचणीत सापडला. शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅंकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, तसेच त्यांची सावकारी जाचातून मुक्तता व्हावी यासाठी माजी मंत्री व अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकचे संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत पीक कर्जाची मर्यादा एकरी २० हजार ऐवजी ३० हजार करावी, अशी मागणी केली होती.

या मागणीला संचालक मंडळाने एकमुखी पाठिंबा दिला व बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. आता मार्च अखेर ज्या सभासदांनी आपले पीक कर्ज पूर्ण भरले असेल अशा सभासदांना १५ एप्रिलपर्यंत ही कर्जसुविधा उपलब्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Kisan Credit Card: शेतकरी शेतीव्यतिरिक्त "या" कामांसाठी KCC कडून कर्ज घेऊ शकतो
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा

तसेच कोरोना काळात संजीवनी ठरलेल्या खेळते भांडवल योजनेचे कर्जही नियमित भरणारांना परत मिळणार आहे. ही दोन्ही कर्ज अल्प व्याजदराने मिळणार असल्याने ऐन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅंकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मार्च अखेर नियमित एप्रिलमध्ये कर्जफेड वाढीव करून कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक कर्डिले यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
नुकसान भरपाई : शेतकऱ्यांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार गोड बातमी..!
शेतकरी संतापला! थेट मार्केटच केले बंद, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?

English Summary: Extending bank credit limit will be of great benefit to farmers Published on: 30 March 2022, 11:11 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters