पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने सुरू केली असून एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन टप्प्यात विभागून सहा हजार रुपये देण्यात येतात.
डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केले जातात. शासनाने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक केले असून त्याची शेवटची मुदत 31 मार्च होती. परंतु आता शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही कारण सरकारने आता पीएम किसान सम्मान निधि योजना साठी e-KYC तिची मुदत वाढवून 22 मे 2022 केली आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in वर देण्यात आली असून शेतकऱ्यांनी आता e-KYC आता बावीस मे 2022 पर्यंत करायचे आहे.
तुम्ही अशा प्रकारे करू शकता तुमची ई-केवायसी
1- या योजनेसाठी e-KYC ची प्रक्रिया पूर्ण करायचे असेल तर सर्वात आधी या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर क्लिक करावे.
2-नंतर या पोर्टलच्या होम पेज वर क्लिक करावे.
3- या होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक टॅब उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती विचारली जाईल.
4-या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकावा.
5-त्यानंतर सर्च बटणावर क्लिक करून तुमचा आधार लिंक मोबाइल नंबर टाकण्याचा पर्याय तुमच्यासमोर उघडेल.
6- आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर चार अंकी ओटीपी येईल. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी तुमच्या मोबाईल नंबर वर पुन्हा सहा अंकी ओटीपी येईल. ओटीपी येथे नमूद करावा.
7- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
8-e-KYC योग्य पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल की तुमची ई-केवायसी योग्य प्रकारे केली गेली आहे.
9- जर तुम्हारा इन व्हॅलिड असा संदेश आला तर अशा परिस्थितीत तुमच्या आधार मधील कोणतीही माहिती चुकीची आहे असे समजावे.
ती चुकीची माहिती आधार सेवा केंद्रात दुरुस्त करावी आणि त्यानंतर पुन्हा संपूर्ण ई-केवायसी ची प्रक्रिया करावी.
10- ही केवायसी चीप्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचादोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात सहजपणे जमा होईल व त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
Share your comments