हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीत वाढ

02 April 2020 07:25 AM


मुंबई:
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि. 23 मार्चच्या मध्यरात्रीपासून दि. 24 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच राज्यात  कलम 144 नुसार दि. 22 मार्च पासून संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हरभरा नोंदणीसाठी अडचणी आहेत. यामुळे राज्यात केवळ 1,36,879 इतकेच शेतकरी नोंदणी करू शकले.

शेतकरी हमी भावाच्या खरेदी पासून वंचित राहु नये यासाठी हरभरा खरेदीकरिता नोंदणी कालावधी 30 दिवसाने वाढविण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी 30 एप्रिल 2020 पर्यंत नोदणी करू शकतील, असे पणन विभागाच्या उपसचिवांनी कळविले आहे.

chick pea gram MSP minimum support price हमीभाव हरभरा किमान आधारभूत किंमत
English Summary: extend duration of the registration process for chickpea purchase

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय








CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.