मुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि. 23 मार्चच्या मध्यरात्रीपासून दि. 24 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.तसेच राज्यात कलम 144 नुसार दि. 22 मार्च पासून संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हरभरा नोंदणीसाठी अडचणी आहेत. यामुळे राज्यात केवळ 1,36,879 इतकेच शेतकरी नोंदणी करू शकले.
शेतकरी हमी भावाच्या खरेदी पासून वंचित राहु नये यासाठी हरभरा खरेदीकरिता नोंदणी कालावधी 30 दिवसाने वाढविण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी 30 एप्रिल 2020 पर्यंत नोदणी करू शकतील, असे पणन विभागाच्या उपसचिवांनी कळविले आहे.
English Summary: extend duration of the registration process for chickpea purchasePublished on: 02 April 2020, 07:26 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments