काल पिक विमा भरण्याची शेवटची तारीख होती. परंतु अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
म्हणून कृषी मंत्री दादा भुसे यांनी पिक विमा योजनेसाठी 23 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी या संबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता व हा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला असून पिक विमा भरण्यासाठी 23 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावे यासाठी राज्य शासनानेकेंद्र सरकारला मुदत वाढी संबंधीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला असून या योजनेत सहभागासाठी 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते की, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यास पीक विम्याची मुदत वाढवण्यात केंद्र सरकारची तयारी आहे. राज्य सरकारने त्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकारची मुदतवाढ देण्यासाठीचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिली असल्याचे दानवे यांनी सांगितले होते व त्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवला होता.
आतापर्यंत राज्यातील फक्त 20 टक्के सरकारने पीक विमा काढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक भागात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अजूनही पेरण्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांनी इच्छा असताना पिक विमा काढलेला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ मिळाल्यानंतर पिक विमा काढण्याच्या टक्का वाढेल अशी आशा आहे.
Share your comments