निसर्गाच्या अनियमितपणामुळे यंदाच्या वर्षी द्राक्षाचा हंगाम लांबणीवर गेलेला आहे. जे की महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यातुन सुद्धा द्राक्षाची निर्यात होते. हंगामाच्या सुरुवातीला द्राक्षामध्ये गोडवा उतरला नसल्याने द्राक्षाची नोंद झाली न्हवती. मात्र आता फेब्रुवारी महिन्यात ऊन वाढल्याने दद्राक्षे निर्यात करण्याजोगे झाले आहेत. द्राक्ष संघाचे मत आहे की मागील वर्षी पेक्षा यावर्षी द्राक्षाची निर्यात कमी होणार आहे. कारण यावर्षी द्राक्ष उत्पादकांवर अनेक संकटे आली आहेत त्यामुळे द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम तर होणार आहेत. सध्या द्राक्षाची जोमात निर्यात सुरू आहे जे की युरोपमध्ये सर्वात जास्त निर्यात होत आहे. तर दुसऱ्या बाजूला युक्रेन आणि रशिया चे युद्ध सुरू आहे मात्र अजून कोणता द्राक्षे निर्यातीवर परिणाम झालेला नाही.
सांगली जिल्ह्यातील निर्यातीची काय आहे स्थिती?
सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्षाची निर्यात करणाऱ्या शेकऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे. मागील वर्षी सांगली जिल्ह्यात द्राक्षे निर्यात करणाऱ्या ४ हजार २८३ शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली होती तर यंदा १ हजार ५२५ शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे. मात्र द्राक्षाच्या हंगामाच्या सुरुवातीला द्राक्षाची निर्यातीयोग्य वाढ झालेली न्हवती त्यामुळे निर्यातीचा वेग ही कमी आला होता. थंडीमुळे द्राक्षामध्ये हवा तसा गोडवा व फुगवण ही योग्य प्रकारे झाली न्हवती. व्यापारी सुद्धा द्राक्षे खरेदी करण्यास नकार देत होते मात्र मागील आठवड्यापासून चित्र काही वेगळस पाहायला भेटत आहे. एका आठवड्यात ३ हजार ६६० टन द्राक्ष ची निर्यात झाली होती जे की १ हजार ३०० टन द्राक्षाच्या निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे.
सर्वाधिक द्राक्ष निर्यात युरोपमध्ये :-
नाशिक जिल्ह्याच्या पाठोपाठ युरोपमध्ये सर्वात जास्त सांगली जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात झाली आहे. सांगली जिल्ह्यातून आता पर्यंत ४ हजार ५६४ टन द्राक्षे निर्यात केली आहेत जे की फक्त युरोप मध्ये १ हजार ६२८ टन द्राक्षाची निर्याय केली आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्षाचा दर्जा तसेच मागणीनुसार पुरवठा होत आहे. मात्र यंदा निसर्गाच्या संकटांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभा राहिला होती. सध्या द्राक्षाची निर्यात वाढत असून यामधून नुकसान भरून निघेल अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवली आहे.
म्हणून युध्दाचा परिणाम निर्यातीवर नाही :-
रशिया तसेच युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सध्या सांगलीतून द्राक्षाची निर्यात होत आहे. रशिया आतापर्यंत संगलीमधून ११६ टन द्राक्षे पाठवले आहेत. सध्या दोन्ही देशात युद्ध सुरू असल्याने अजून तरी निर्यातीवर कोणता परिणाम झालेला नाही. मात्र भविष्यात युक्रेनमधील द्राक्षे निर्यातीस अडचणी निर्माण होऊ शकतात असे द्राक्ष उत्पादक संघाचे कैलास भोसले सांगत आहेत. मात्र सध्या दोन्ही देशांना द्राक्षाची निर्यात व्यवस्थितपणे चालू आहे असेही कैलास भोसले सांगतात.
Share your comments