यावर्षी कापूस कधी नव्हे एवढ्या उच्चांकी भावाने विकला गेला. अजूनही कापसाच्या भावात तेजीत आहे. जर आपण आजही आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर कापसाचे दर हेच तेजीतच आहेत.
तसेच केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केले. यासारख्या गोष्टींचा परिपाक म्हणून भविष्यात देखील कापसाची मागणी वाढणार असून कापूस दरातील तेजी ही कायम राहणार आहे. त्यामुळे ज्या कोणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस असेल त्यांनी घाबरून अजूनही विक्री करू नये असे आवाहन जाणकारांनी केले आहे.देशात कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली आहे.
मागणीच्या मानाने कापसाचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने कापसाच्या दरात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे कापसाच्या आयातीवर असलेले शुल्क रद्द करावे अशा आशयाची मागणी कापड उद्योग मागील काही दिवसांपासून सातत्याने करीत होता. ते अनुषंगाने केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केले आहे. हे शुल्क रद्द केल्यामुळे कापसाचे आयात ही वीस ते पंचवीस लाख गाठी कापूस इतकी या सप्टेंबर पर्यंत होऊ शकते असे देखील म्हटले जात आहे.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कापसाच्या भावाची स्थिती
केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क कमी केले असले तरी या निर्णयाचा कुठलाही परिणाम कापूस दरावर होणार नाही असे जाणकारांनी सांगितले. कारण आपण देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाच्या भावाला तेजी आहे.
नक्की वाचा:नाद नाय करायचा! 75 दिवसात 5 एकर मधून या पिकाने दिले तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पादन
जर आपण इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंजचा विचार केला तर कापसाच्या स्पॉट चे दर 150 ते 152 सेंट प्रति पाऊंड च्या दरम्यान आहेत. म्हणजेच आपण एक खंडीचा विचार केला तर प्रति खंडी 92 हजार रुपयांच्या दरम्यान हा दर पडतो. त्यामध्ये आयात वाहतूक खर्च पाच हजार रुपयांपर्यंत येतो. म्हणजेच आयात कापूस 97 हजार रुपये प्रति खंडी वर पडेल. आपल्या देशाचा विचार केला तर हा दर एक लाख रुपयांच्या दरम्यान आहे, आयात कापूस आणि देशातील दर यात फारसा फरक नाही. त्यामुळे देशातील दर कमी होतील अशी शक्यता नाही. असे देखिल या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
Share your comments