1. बातम्या

महाराष्ट्रात 'या' भागात पिकतो विदेशी काळा उस; म्हणून 'या' भागातील ऊस उत्पादक शेतकरी होतायेत लखपती

राज्यात अनेक भागात उसाची लागवड केली जाते, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उस लागवड बर्‍यापैकी नजरेस पडते. राज्यातील इतर भागातही थोड्या मोठ्या प्रमाणात उसाची लागवड बघायला मिळते. राज्यात असं एक गाव आहे जिथे विदेशी काळ्या रंगाच्या उसाची लागवड केली जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

राज्यात अनेक भागात उसाची लागवड केली जाते, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उस लागवड बर्‍यापैकी नजरेस पडते. राज्यातील इतर भागातही थोड्या मोठ्या प्रमाणात उसाची लागवड बघायला मिळते. राज्यात असं एक गाव आहे जिथे विदेशी काळ्या रंगाच्या उसाची लागवड केली जाते.

विदर्भातील वाशीम जिल्ह्याच्या मौजे काटा गावात गेल्या अनेक वर्षांपासून मॉरिशसच्या काळ्या उसाची शेती केली जात आहे. या गावात उत्पादित केल्या जाणाऱ्या काळा ऊस सध्या एक चर्चेचा विषय ठरला आहे. काटा गाव संपूर्ण विदर्भात नव्हे नव्हे तर राज्यात ऊस लागवडीसाठी ओळखले जाते, काटा गावात मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्राचा वापर करत आधुनिकतेची कास धरत शेतकरी बांधव शेती करत आहे. काटा गाव शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याने कायम चर्चेत राहत असते. काटा गावात उत्पादित केला जाणारा काळा ऊस हा विदेशातून आणला गेला आहे. अठराव्या शतकात जगन्नाथ शंकर शेठ यांनी हा काळा ऊस मोरेसिस होऊन आणला होता, काटा गावातील शेतकऱ्यांनी या काळ्या उसाची शेती केली म्हणून या उसाला मॉरिषेस उस असे देखील म्हणतात.

आपला नेहमीच्या उसाला खूपच अत्यल्प बाजार भाव मिळत असतो, तसेच या उसाला मागणी देखील कमी असते. मात्र काटा या गावात उत्पादित केल्या जाणाऱ्या काळा ऊसाला सदैव मागणी असते आणि याला चांगला बाजार भाव देखील मिळत असतो. काट्याच्या या उसाला देशांतर्गत असलेल्या मोठ्या बाजारपेठेत मागणी आहे काट्याचा हा ऊस तेलंगाना मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल होतो. या उसाला या तीन राज्यात मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. शिवाय काट्याचा काळा ऊस आज संपूर्ण राज्यभर विकला जातो. 

सध्या मौजे काटा येथे शेकडो हेक्टर क्षेत्रावर काळा ऊस लावला गेला आहे आणि गावातील शेतकरी यातून चांगले उत्पादन मिळवत आहेत. काळा ऊस आरोग्याला चांगला असल्याने याची बारामही मागणी असल्याचे समजते. काट्याचा दणकट जमिनीत जोमाने बहरणारा हा ऊस येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता प्रधान करण्याचे कार्य करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

English Summary: Exotic black sugarcane grows in 'Ya' area of ​​Maharashtra; So the sugarcane growers in this area become lakhs Published on: 02 February 2022, 11:40 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters