मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत खदखद बाहेर येत आहे. फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या घडीला काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी.
विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, धुसफूसही उघड व्हायला लागली आहे. बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, काल आमदारांची फूट यावरुन बाळासाहेब थोरात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. थोरात काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची सूत्रांची माहिती आहे.
'मी पुन्हा येईन' चा प्रयोग होणार यशस्वी? एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यात दाखल..
महाविकास आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्याने 'ब्लेमगेम'ला सुरुवात झाली आहे. नाराजीनाट्य वाढल्याने काँग्रेसमधील उमेदवारांनी देखील क्रॉसवोटिंग केल्याचं स्पष्ट झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाचा आदेश धुडकावल्याने आता जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर आली आहे. यामुळे काँग्रेसच्या गटनेता पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Share your comments