1. बातम्या

सांगा शेती का करायची? पुन्हा खतांच्या किंमतीत झाली दरवाढ, शेतकऱ्यांच्या संकटात अजून पडली भर

यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट घडून आली आहे, यातून कसाबसा सावरत शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे. या चालू रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे पेरणीला विलंब झाला, तसेच या पावसामुळे व त्यानंतर तयार झालेल्या वातावरणामुळे पेरणी झालेल्या पिकाला देखील मोठा फटका बसलेला आहे. गोष्ट फक्त अस्मानी संकटांचीच नाही तर आता सुलतानी संकट देखील मान डोकावून वर पाहू लागले आहे, नुकतीच अशी बातमी समोर आली आहे की रासायनिक खतांमध्ये तब्बल 490 रुपयांपर्यंत दर वाढ ही झालेली आहे, ही बातमी साहजिकच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे, या दरवाढी विरोधात अनेक शेतकरी संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
fertilizer price get hike

या दरवाढीविरोधात अशी माहिती समोर येत आहे की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. खरीप हंगामात पूर्णतः शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्यामुळे हाती उत्पन्न नसताना पिकाची जोपासना कशी करायची असा प्रश्न आधीच शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिलेला होता आणि आता ही दरवाढ त्यामुळे अधिकचा पैसा शेतकऱ्यांना मोजावा लागणार आहे. पिकाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी रासायनिक खतांची गरज ही भासतेच, आणि सध्या रब्बी हंगामातील पिकांना खतांची आवश्यकता आहे, वातावरणातील बदलामुळे पिकांना खताची अधिक मात्रा द्यावी लागणार आहे. त्यामुळे खतांच्या दरात झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट घडवून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे.

यावर तज्ञांचे काय आहे मत- तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत कमालीची वाढ घडून आली आहे याचाच परिणाम हा देशांतर्गत रासायनिक खतांवर दिसून येत आहे, असे असले तरी रासायनिक खतांच्या किमतीत चक्क 490 रुपयांपर्यंत दर वाढ करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. नुकतीच सरकारने या एफ आर पी मध्ये 50 रुपयांची वाढ केली, अनेक शेतकरी नेते असे सांगत आहेत की सरकारने ची एफ आर पी मध्ये 50 रुपयांची वाढ केली, त्याची भरपाई म्हणून रासायनिक खतांमध्ये तब्बल 490 रुपयांपर्यंतची ही दरवाढ करण्यात आली. एकंदरीत सुलतानी संकटाचा सामना करणारे शेतकरी बांधव आता असा प्रश्न उभा करत आहेत की शेती का करायची? 

रासायनिक खतांचे नेमके दर किती वाढलेत-रासायनिक खतांमध्ये फक्त युरिया व डीएपी सोडून जवळपास इतर सर्व खतांवर दरवाढ करण्यात आली

खते

दरवाढ

सुफला 15:15:15

270

ईफ्को 10:26:26

295

ईफ्को 12:32:16

295

महाधन 24:24:0

490

English Summary: except uriya and dap all fertilizers prices increased tremendously Published on: 17 December 2021, 08:58 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters