मराठवाडा च्या विकासासाठी अर्थचक्र गतीने फिरण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे
तसेच मराठवाड्यात एसबीएच चे एसबीआय मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर मराठवाड्यात बँकांच्या शाखा फार कमी झाले आहेत. त्यामुळे मराठवाड्यात बँकांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे असल्याचे तसेच या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढविण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी झालेल्या राष्ट्रीय बँक परिषदेत बँकांच्या अध्यक्षांना दिल्या.
या बैठकीत कराड यांनी मुद्रा लोन विषयी बोलताना म्हटले की, मुद्रा लोन बाबत सर्वाधिक तक्रारी आहेत वही समस्या प्रामुख्याने मराठवाड्यात अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मराठवाड्यातील या मुद्रा लोन बाबत च्या सगळ्या अडचणी सोडविण्याच्या सूचना त्यांनी बँकांना दिल्या. तसेच त्याने बँकेकडून वेळेत कर्ज पुरवठा व्हावा अशी अपेक्षा देखील डॉक्टर कराड यांनी व्यक्त केले.
कर्ज पुरवठा सुरू होण्याच्या वेळेस बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदली या समस्येवर वर देखील त्यांनी तोडगा काढण्याची सूचना केली. तसेच औरंगाबाद मध्ये ऑनलाईन कृषी कर्ज पुरवठा करण्यात येत असून त्यामुळे कर्जपुरवठा वाढल्याची माहिती त्यांनी दिली.
Share your comments