आता कुठे राज्यात दुधाचे दर वाढले आहेत तो पर्यंत पशुखाद्य निर्माते तसेच विक्रेत्या वर्गाने पशुखाद्य दरामध्ये सुद्धा वाढ केली असल्याने पुन्हा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. आधीच कोरोनामध्ये सर्व बंद असल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान झाले होते आणि आता कोरोना काळानंतर दोन वर्षांनी कुठे शासनाने गायी व म्हैसी च्या दुधाच्या दरात दर वाढ केली आहे. जे की या दूधदर वाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होतोय की नाही तोपर्यंत पशुखाद्यनिर्मिती करणाऱ्या व पशुखाद्य व्यापारी वर्गाने पशुखाद्याच्या दरात वाढ केली.
पशुखाद्य दरात झाली वाढ :-
कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर शासनाने आता कुठे दुधाच्या दरात वाढ केली तो पर्यंत गाई व म्हैसी याना लागणार जो चारा आहे जसे की सरकी पेंड जे की ५० किलो किमंत १८०० रुपये होती त्याच सरकी पेंडेची किमंत १८०० रुपये वरून २००० ते २२०० रुपये वर नेहण्यात आली आहे. तसेच दुभत्या जनावरांना लागणारा जो भुसा आहे त्या भूशाची किमंत ९५० रुपये होती तर आता तो भुसा १५०० रुपये नेहण्यात आलेला आहे. दूध दर वाढण्यापूर्वी कांडी खाद्याचा ५० किलो चे दर ११५० रुपये होता तर आता त्याची किंमत १६५० रुपये वर नेहण्यात आली आहे. तर मका या खाद्याचा १ क्विंटल चा दर पहिला ११०० - १२०० रुपये होता तर आता थेट दुप्पट दर करण्यात आला आहे म्हणजेच २२०० रुपये वर मका गेली आहे. एवढेच नाही तर जनावरांना खाद्यामध्ये देण्यात येणारे मिनरल मिक्चर, कॅल्शियम तसेच ज्यावेळी जनावरे आजरी पडतात त्यावेळी त्यांना देण्यात येणारी जी औषधे आहेत त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
पशुखाद्य व्यापाऱ्यांची दरवाढीत मनमानी :-
दुधाचे दर वाढले की पशुखाद्याच्या किंमतीमध्ये सुद्धा लगेच वाढ केली जात आहे जे की दुधाचे दर वाढले की पशुखाद्य किमतीत वाढ केली नाही पाहिजे, मात्र याउलट चित्र पाहायला भेटत आहे. ज्यावेळी दुधाचे दर २० रुपये प्रति लिटर होते त्यावेळी सुद्धा पशुखाद्याच्या किंमती काय कमी न्हवत्या. पशुखाद्य विक्रेते स्वतः दर वाढवून आपली मनमानी करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. या मनमानी केलेल्या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकरी गडबडला जात आहे. दुधाचे दर वाढवून सुद्धा शेतकऱ्याला कसलाच फायदा होत नाही जे की यामध्ये असणारी जी दलाल मंडळी आहे तीच फायदा उठवत आहे. असे झाल्याने शेतकरी आपला संताप व्यक्त करत आहेत.
हिरव्या चाऱ्याचे देखील वाढले दर :-
दुभत्या जनावरांना लागणारे पशुखाद्य जसे की मका, उसाचे वाढे, ऊस तसेच गिणीसारखा हिरवा चारा या हिरव्या चाऱ्याचे देखील दर वाढले आहेत. दुधाचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांच्या एका हाती पैसे येईपर्यंत दुसऱ्या हातून निघून जातोय त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बेकारी चालू आहे. कच्चा मालाच्या कोणत्याही प्रकारच्या किमती वाढल्या नसल्या तरी सुद्धा पशुखाद्याच्या दरामध्ये विक्रेत्यांनी आपल्या मनमानी नुसार वाढ केली आहे.
Share your comments