उसाला पोषक वातावरण असल्यामुळे उसाच्या क्षेत्रात तसेच त्याच्या उत्पादनात सुद्धा चांगली वाढ झालेली आहे. कारखान्याला ऊस घालवण्यासाठी शेतकरी खूप प्रयत्न करत आहेत. १२ महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे ऊस कारखान्याला जातो मात्र लातूर मधील निलंगा तालुक्यातील उसाला १५ महिने झाले आहेत तरी सुद्धा ऊस अजून शेतात उभा आहे. या उसाला तुरे फुटले आहेत तर या उसाला उंदीर पोखरत आहे. लातूर मधील एका बाजूला पाहायला गेले तर मांजरा पट्यातील शेतकरी उसाच्या उत्पादनामुळे सदन होत निघाले आहेत तर त्याच जिल्ह्यात दुसऱ्या बाजूला म्हणजेच मांजरा तालुक्यात शेतकऱ्यांची अशा प्रकारे अवस्था चालू आहे. जर योग्य वेळेत उसाचे गाळप नाही झाले तर उसाच्या उत्पादनात घट होते.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
कारखान्यामध्ये नोंद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस दोन महिने उशीर झाल्याने कारखाने गाळप करतील का नाही याची भीती शेतकऱ्याना पडलेली आहे त्यामुळे कारखान्याच्या कार्यालयात शेतकरी सारखे येडे घालत आहेत. निलंगा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यात नोंद नाही तर काही सभासद नसल्यामुळे उसाच्या उत्पन्नात होणाऱ्या तोट्यामुळे शेतकरी घाबरले आहेत. मात्र मांजरा मधील कारखाने उसाला योग्य दर देतात मात्र आता १४-१५ महिने उलटून गेले तरी सुद्धा कारखाने ऊस गाळप करत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
ऊसाच्या उतारावर होणार परिणाम
जर १० - ११ महिन्याच्या उसाचे गाळप झाले की शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. निलंगा तालुक्यातील उसाला १३-१४ महिने जरी झाले तरी सुद्धा तो शेतात उभा आहे त्यामुळे त्यास तुरा फुटला आहे शिवाय उंदीर पोखरत आहेत आणि याचा परिणाम उसाच्या उत्पादनावर होणार आहे. जर उसाची तोड होण्यास उशीर झाला तर साखर कारखाने सुद्धा उसाकडे दुर्लक्ष करतात. मांजरा पट्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पन्न घेतात मात्र यावेळी अतिवृष्टी झाल्याने उसाचे नुकसान झाले तरी सुद्धा त्यांनी जोपासला. परंतु आता कारखाना तोडणीच करत नसल्याने उसाचे नुकसान होऊ लागले आहे.
तालुक्यात एक कारखाना तोही बंद अवस्थेत
उसाला पर्याय म्हणून ऊस उत्पादक सभासद हनुमान खांडसरी कारखान्याकडे पाहत आहेत मात्र त्या कारखान्यात सुद्धा वेटिंग लागले आहे जे की शेतकरी कारखाण्यात चकरा मारून मारून हैराण झाले आहेत. निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस घालवण्यासाठी जो हक्काचा सहकारी साखर कारखाना होता तो अनेक वर्षांपासून बंद पडलेला आहे.
Share your comments