गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी हे उसाच्या वजनात तफावत असल्याची तक्रार करत आहेत. यामुळे यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. वजनकाटे ऑनलाइन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यासाठी राजू शेट्टी यांनी पुण्यात मोर्चा देखील काढला आहे. असे असताना आता पंढरपूर तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Sahakari Sakhar Karkhana Election) सुरू आहे.
यामध्ये आमच्या कारखान्याच्या काट्यात एक किलोचा जरी फरक पडला तर एक लाखाचे बक्षीस देऊ, असे कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू आहे.
ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून
ते म्हणाले, कोणत्याही शेतकऱ्याने कोणत्याही काट्यावर वजन चेक करुन भीमा कारखान्यावर आणावा. येथे आमच्या काट्यावर एक किलो जरी वजन कमी भरले तर एक लाखाचे बक्षीस देऊ, असे म्हटले आहे.
यामुळे निवडणुकीत हा मुद्दा प्रभाव पडणार आहे. वजनकाटा, ऊसबिले आणि जाहीर केलेला 2600 रुपयांच्या भावामुळे खासदार महाडिक यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या निवडणुकीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा दाखल
दरम्यान, धनंजय महाडिक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील मैदानात उतरले आहेत. तसेच आता भाजपचा परिचारक गट देखील राष्ट्रवादीच्या मदतीला धावल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या:
साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय, उत्तर प्रदेशला जास्त कोटा...
महाराष्ट्राची दिल्ली होणार? महाराष्ट्र डेंजर झोनकडे, धूलिकणांचे प्रदूषणामुळे दिला धोक्याचा इशारा
घोडगंगा सहकारी कारखान्यात राष्ट्रवादीच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना धक्का
Share your comments