पीएम किसान सन्मान निधी योजनाचा १० हप्ता जमा होऊन १ आठवडा झाला मात्र देशातील अजून ६० लाख २९ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही हप्ता जमा झाला नसल्याची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जरी योजना राबवली असली तरी राज्य सरकार सुद्धा तेवढेच याबाबत जबाबदार आहे. या योजनेसाठी कोण पात्र आहे तसेच कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे बघणे राज्य सरकारच्या विविध विभागाची जबाबदारी आहे. जे की आज सात दिवस लोटले तरीही अजून हप्ता जमा झाला नाही.
यामुळे मिळालेले नाहीत योजनेचे पैसे :-
ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाहीत ते नक्की शेतकरीच आहेत का याची तपासणी सुरू आहे तसेच मध्यंतरी अनेक अधिकारी वर्गाने पैसे हडपले होते त्यामुळे पैसे रोखून ठेवले आहेत. महसूल विभागाकडून शेतकऱ्यांचा अहवाल, बॅंके खाते, आधार कार्डवरील स्पेलिंग मिस्टेक अशा त्रुट्या आढळून आल्याने पैसे रोखून धरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जे या योजनेसाठी अपात्र आहेत ते सुद्धा लाभ घेतल्याचे समोर आले आहे जो की मागील दोन वर्षांपासून हा प्रकार घडत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर अशा प्रकारे होतात पैसे जमा:-
जरी ही योजना केंद्र सरकारने राबविली असली तरी सुद्धा राज्य सरकारची यामध्ये मोठी जबाबदारी आहे. हा शेतकरी या योजनेस पात्र आहे हे राज्य सरकारच्या यंत्रणेकडूनच सांगितल्यावर समजते. केंद्र सरकार हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत नाही तर राज्य सरकारच्या आकडेवारीवर जाऊन मग निधी जमा करते त्यानंतर मग शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.
अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे?
केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी pmkisan.gov.in ही वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवर क्लिक करून लॉग इन करावे आणि त्यानंतर Beneficiary Status क्लिक करावे व त्यावर आपला मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकावा. क्लिक करून मेसेज येतोय का पाहायचा जे की पैसे जमा झाले तरी मेसेज येईल नाहीतर मेसेज येत नाही व कारण सांगितले जाते. तुम्ही ही प्रिंट काढून बँकेत गेला तरी तुमचा प्रश्न मार्गी लागेल तसेच जर काय नाही झाले तर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी बोलावे. या योजनेच्या माहितीसाठी 155261/011-24300606 या नंबरवर क्लिक करावे.
अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा :-
अर्ज करताना त्यामध्ये सर्व कागदपत्रे तपास तसेच त्यावर असलेले नाव तपासून पाहा. आधार कार्ड क्रमांक तपासून घ्या जो की चुकीचा भरला असला तर दुरुस्त करावा. या अनेक चुकांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाऊस जमा होत नाहीत. तसेच दुसऱ्या बाजूस ३३ लाख शेतकरी आहेत जे पात्र नसूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. आता त्यांच्याकडून वसुली सुरू आहे.
Share your comments