1. बातम्या

इथेनॉल 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता: पंतप्रधान मोदी

जागतिक हवामान (Global climate) बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून इथेनॉल (Ethanol) चा वापर 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी स्पष्ट केलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने (दिनानिमित्त (World Environment Day) पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी इथेनॉलच्या वापरासंबंधी संवाद साधला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन' ही या कार्यक्रमाची मुख्य कल्पना होती.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
पंतप्रधान मोदी

गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही 250 पटींहून अधिक झाल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. सध्या वापरात असलेल्या रिन्यूएबल एनर्जीच्या क्षमतेबाबत भारत जगातील पहिल्या पाच देशांच्या यादीत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या ६ वर्षाच्या काळात भारताच्या सौर उर्जेची क्षमता ही जवळपास 15 टक्क्यांनी वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

इथेनॉलच्या वापरावर भारत लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केल्यानं त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करायचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी एक रोडमॅप जाहीर करण्यात आला आहे."देशभरात इथेनॉलच्या उत्पादनाशी आणि वितरणाशी संबंधित महत्वाकांक्षी E-100 पायलट प्रोजेक्टची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे.

जागतिक हवामान बदलाच्या संकटाबद्दल भारत जागरुक असून त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत सक्रियतेनं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 'One Sun, One World, One Grid' हे स्वप्न साकार करण्यासाठी इंटरनॅशनल सोलर असायन्स भक्कम व्हायला पाहिजे अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

English Summary: Ethanol India's Priority in the 21st Century: Prime Minister Modi Published on: 05 June 2021, 10:05 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters