1. बातम्या

वर्ष 2019-20 साठीच्या खरीप हंगामातल्या प्रमुख पिकांचा अंदाज

नवी दिल्ली: यंदाच्या म्हणजेच वर्ष 2019-20 मधल्या खरीप पिकांचा प्राथमिक अंदाज कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केला. आत्तापर्यंत विविध राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर हा प्राथमिक अंदाज तयार करण्यात आला आहे.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
यंदाच्या म्हणजेच वर्ष 2019-20 मधल्या खरीप पिकांचा प्राथमिक अंदाज कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केला. आत्तापर्यंत विविध राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर हा प्राथमिक अंदाज तयार करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार देशात यंदा अन्नधान्याचे एकूण उत्पादन 140.57 दशलक्ष टन एवढे होईल.

  • तांदूळ- 100.35
  • पोषक कडधान्य- 32
  • डाळी- 8.23
  • तूर- 3.54
  • मका- 19.89 दशलक्ष टन अशा विविध धान्यांचा समावेश आहे.

तेलबियांचे एकूण उत्पादन 22.39 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. यात सोयाबीन- 13.50 आणि शेंगदाणे- 6.31 दशलक्ष टन असेल. कापसाचे उत्पादन यंदा 32.27 दशलक्ष गासड्या इतके होईल तर तागाचे उत्पादन 9.96 गासड्या इतके होईल. या खरीप हंगामात ऊसाचे उत्पादन 377.77 दशलक्ष टन इतके होण्याचा अंदाज आहे.

आत्तापर्यंतच्या मोसमी पावसाची आकडेवारी लक्षात घेतली असता सप्टेंबर मध्यापर्यंत देशभरात सरासरीपेक्षा 4 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

English Summary: Estimates of major crops in kharif season for the year 2019-20 Published on: 24 September 2019, 04:52 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters