आपल्या देशात कोण कोणता माल, कोणकोणत्या उत्पादने आयात केली जातात याची माहिती माहिती घेऊन या होणाऱ्या आयातीला भक्कम भारतीय पर्याय निर्माण करून आयात कमी करणे आणि निर्यात वाढवून विकास साधणे गरजेचे आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा ग्रामीण भाग-भाग असून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात दोन ते तीन उद्योग सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.गायीच्या शेणापासून निर्माण होणारा पेंटचा उद्योग प्रत्येक गावात सुरू व्हावा. या उद्योगांमध्ये बाराला गुंतवणूक करून हा उद्देश रोखता येतो.
हेही वाचा : खूशखबर ! बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 10 कोटींचा निधी मंजूर
या उद्योगासाठी चे ट्रेनिंग सुरू झाले आहे असे त्यांनी सांगितले. एमएसएमईतील भारतीय उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते.
एमएसएमई ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याचा सकल राष्ट्रीय उत्पन्नात जवळजवळ तीस टक्के सहभाग आहे. 48 टक्के निर्यात व 11 कोटी रोजगार निर्मिती या विभागाने केली आहे, असेही ते म्हणाले.
Share your comments