सध्या जर आपण विजेचा विचार केला तर विजेचा वापर खूप वाढला असून येणाऱ्या भविष्य काळामध्ये विजेची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आजदेखील बरेचदा कोळशाची टंचाई भासत असल्यामुळे वीज निर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो.सौर ऊर्जा सारख्या परंपरागत ऊर्जास्रोतांचा कुशलतेने वापर करणे खूप गरजेचे आहे.
याच दृष्टिकोनातून केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या प्रकारची पावले उचलत असून सौर ऊर्जा वापराला आणि वीज निर्मितीवर भर देण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या योजनादेखील राबवल्या जात आहेत. अगदी घरगुती वापरापासून ते कृषिपंपांचा वापरासाठी देखील सौर ऊर्जेचा वापर यासाठी केंद्र सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे.
त्याच अनुषंगाने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे मला एकशे पाच मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणांमध्ये उभारला जाणार असून या संबंधीचा करार महानिर्मिती आणि सतलज जल विद्युत निगम मध्ये झाला आहे.
येणाऱ्या 15 महिन्यानंतर या प्रकल्पातून प्रत्यक्षात वीज निर्मितीला सुरुवात होणार असून या ठिकाणच्या तयार विजेचा प्रति युनिटचा दर 3 रुपये 93 पैसे असणार आहे व करारानुसार ही तयार वीज येणाऱ्या 25 वर्षांपर्यंत महानिर्मितीला पुरवली जाणार आहे.
कशा स्वरूपाचा आहे हा प्रकल्प?
आपल्याला माहित आहेच कि, औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु कोळशाच्या वापरामुळे हवेच्या प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोळसाच्या किमतीमध्ये जी काही सातत्याने वाढ होत असते त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम हा विजेच्या दरवाढीवर देखील होतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता इरई धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागविण्यात आले आहेत.
हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प इरई धरणातील पाण्याच्या पृष्ठभागावर पाचशे पंचवीस एकर जागेमध्ये असणार असून यासाठी सातशे तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जर आपण या प्रकल्पाच्या वीज निर्मिती क्षमतेचा विचार केला तर एका वर्षाला दोनशे तीस दशलक्ष युनिट वीज निर्मिती या माध्यमातून होणार आहे.
नक्की वाचा:'गोलू' चा पॅटर्नच वेगळाय! खाद्य आणि किंमत वाचून येईल चक्कर..
Share your comments