सरकारकडून पिकांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आणि उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे फळपिकांचे देखील निर्यात सुलभ व्हावी यासाठी ज्या ज्या विभागातून जे जे फळ जास्त प्रमाणात पिकवले जाते त्या फळांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. म्हणजे कोकण विभागाचा जर विचार केला तर तिथे हापूस सह इतर फळपिकांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानुसार आज जर आपण मराठवाडा आणि विदर्भाचा विचार केला तर केशर आंबा व मोसंबी फळ पीक जास्त प्रमाणात पिकवली जाते. या पार्श्वभूमीवर मोसंबी आणि केशर आंब्यासाठी मराठवाडा आणि विदर्भावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र निर्यात करता यावी म्हणून जिल्ह्यांची व शेतकरी गटांची यामाध्यमातून निवड केली जाणार आहे. फळपिकांचे उत्पादनानुसार त्या-त्या जिल्ह्यामध्ये सुविधा केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतची माहितीजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पणन विभाग तसेच कृषी आयुक्त यांना दिली आहे.
नक्की वाचा:कौतुकास्पद! आता शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार, १५ वर्षीय मुलाने बनवलं एक खास अँप
केशर आंबा उत्पादनाच्यादृष्टीने निर्यातीबाबत मराठवाड्यातील या नऊ जिल्ह्यांचा समावेश
जर आपण केशर आंबा च्या बाबतीतविचार केला तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, बीड, नगर, लातूर, जालना, परभणीआणि नाशिकया जिल्ह्यांमध्ये सुविधा उभारल्या जाणार आहेत.जर आपण यांना जिल्ह्याचा विचार केला तर या नऊ जिल्ह्यांमध्ये जवळजवळ केशर आंब्याची लागवड ही 21 हजारपेक्षा जास्त हेक्टरवर झाली आहे. या आंब्याच्या निर्यातीसाठी आवश्यक सोयी-सुविधा लागतील त्यामध्ये पॅक हाऊस, ग्रेडीज लाईन, कोल्ड स्टोरेज इत्यादी सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे.
यादी मराठवाड्यातील जालना येथे निर्यात सुविधा केंद्र असूनया सुविधा केंद्राच्या माध्यमातून जर आपण 2006 पासून ते 2015 पर्यंत विचार केला तर 193.28आंबा निर्यात करण्यात आला होता. याबाबतीत मुंबई व पुण्यासारख्या शहरातील काही अंबा निर्यातदार यांची संख्या व कंपन्यांचा देखील शोध घेण्यात येत आहे.
या मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये केशर आंबा उत्पादन चांगल्या प्रकारे केले जाते. तसेच या जिल्ह्यांमध्ये 1639 शेतकरी उत्पादक कंपन्या असूनया कंपन्यांच्या माध्यमातून आंबा निर्मितीची प्रक्रिया ही सहजरित्या होऊ शकते.आंबा पिकाबरोबरच मोसंबी पिकासाठीनिर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मोसंबी फळाच्या निर्यातीसाठी देखील 9 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्येऔरंगाबाद, जालना, नागपूर, जळगाव, अमरावती, वर्धा, बीड, नांदेड आणि परभणी या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मोसंबी निर्यातीसाठी काढणीपूर्व व काढणीपश्चात व्यवस्थापन, पायाभूत सुविधा व वाहतूक, गुणवत्ता विकास, बाजार विकास व संस्थात्मक संरचना हाती घेतली जाणार आहे.
Share your comments