1. बातम्या

पीकेव्ही डाळमिल वापराने शेतकरी होणार उद्योजक

विदर्भात कोरडवाहू शेती, सततचे दुष्काळ, कर्जबाजारीपणा, प्रक्रिया उद्योगाची कमतरता इत्यादी प्रमुख कारणे शेतकरी आत्महत्येची सांगता येतील. विदर्भात डाळवर्गीय पिके उदा तूर, हरभरा, उडीद,मूग इत्यादी मोठ्या प्रमाणात पिकवली जातात, पण बाजारात भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कधीकधी निघत नाही.

KJ Staff
KJ Staff


विदर्भात कोरडवाहू शेती,  सततचे दुष्काळ,  कर्जबाजारीपणा, प्रक्रिया उद्योगाची कमतरता इत्यादी प्रमुख कारणे शेतकरी आत्महत्येची सांगता येतील. विदर्भात डाळवर्गीय पिके उदा तूर, हरभरा, उडीद,मूग इत्यादी मोठ्या प्रमाणात पिकवली जातात, पण बाजारात भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कधीकधी निघत नाही. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे.  विदर्भातील लोकांना या कृषी प्रक्रिया उद्योगात अधिक फायदा होऊ शकतो.  कारण  डाळवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.  डाळ निर्मिती उद्योग शेतकरी करू शकतात आइणि त्यातून अधिक नफा मिळवू शकतात.  आज आपण या लेखाच्या माध्यमातून कितीही दालमिल बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

पीकेव्ही मिनी डाळ मिलला, कृषी शक्ती व अवजारे विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी १९९७  साली विकसित केले आहे.  पीकेव्ही डलमिल यंत्राद्वारे सर्व प्रकारच्या डाळी तयार करता येतात उभारण्यासाठी कमी भांडवली खर्च असल्यामुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगारासाठी महत्त्वाचे साधन मिळू शकते. या यंत्रामध्ये सफाई- प्रतवारी- पॉलिशर यंत्र व पिकेही दालमिल ही दोन यंत्रे असतात.

 पीकेव्ही दालमिल यंत्राची तुर डाळ तयार करण्याची क्षमता ८ तासांमध्ये ८ ते १० क्विंटल आहे.  तर मुंग व उडीद १० ते १२ क्विंटल इतकी आहे.  यंत्रामध्ये भुसा आणि पावडर, चुरी,  डाळ, गोटा आणि दाणे अशा चार भागात वर्गीकरण केले जाते. याबरोबरच तेल व पाण्याची सुद्धा व्यवस्था यंत्रातच असते.

 
ग्रामीण भागातील युवकांनी महिलांनी बचत गटांनी आपला व्यवसाय सुरु करावा सोबतच इतरांनाही रोजगार देऊन त्यांच्या जीवनात बदल घडवावा.

पिकेव्ही मिलचे काही प्रमुख आधिकृत विक्रेते

 १) मे. व्ही. मनुफॅक्चरिंग व सप्लायर तुलसी कॉम्प्लेक्स जिल्हा उद्योग कोरेगाव रोड परभणी

२)मे.  वेल्डिंग वर्क्स डि-5 एमआयडीसी फेस-2 अकोला

३) मे. श्रीराम असोसिएट्स प्लॉट नंबर जे 27 एमआयडीसी फेस ३ अकोला

४)  मे. मा दुर्गा प्लास्टिक प्रोडक्स एमआयडीसी फेस ३ अकोला

५) मे. प्राजक्ता अग्रो मशिनरी  यु-४४ एमआयडीसी नंबर 4 अकोला

६) मी कामधेनु ऍग्रो मशनरी फ्लॅट नंबर ६ हिवारी नगर जवळ, पावर हाऊस , वर्धा रोड नागपूर

७) मी श्रीहरी वेल्डिंग वर्क्स एमआयडीसी, चिखली , प्लॉट नंबर ए-३८, ए-३९ ता. चिखली ,जि. बुलडाणा

८) मे.  वेलकम इंडस्ट्रीज नांदगाव खंडेश्वर, अमरावती

९) मेसाई मशनरी एस नं. २५ प्लॉट नंबर ५३ प्लॉट नंबर २०१ राधारमण पॅलेस, अष्टविनायक कॉलनी, पाईपलाईन रोड सावेडी,  अहमदनगर

१०) मे व्यंकटेश ऍग्रो इंजीनियरिंग, जालना

English Summary: Entrepreneurs will become farmers through the use of PKV Dal mill Published on: 17 August 2020, 07:47 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters